चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच फॅशन आणि लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो. ‘कॉफी विथ करण’मध्ये करणच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव अनेक कलाकारांना आला आहे. परंतु अचानक आज त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक वेगळीच स्टोरी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण जोहर म्हणजेच बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या लोकप्रिय ‘केजो’ने अचानक आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सौंदर्याची व्याख्या मांडत करणने अनेकांना खडेबोल सुनावले आहेत. आजकाल सौंदर्यासाठी जे लोकं फिलर्स, सर्जरी करतात त्यांच्याबद्दल केजोने भाष्य केलं आहे.

करण म्हणाला, “फिलर्स केल्याने तुम्हाला पूर्तता मिळणार नाही. मेकअपचा वापर केल्याने जे वय वाढणार आहे ते थांबणार नाही. कितीही बोटॉक्स केलं तरी मधमाशी चावल्यासारखेचं तुम्ही दिसाल. नाक बदलून घेतलं तरी गंध अत्तरासारखा येणार नाही. सर्जरीमुळे तुम्ही बाहेरून जरी बदलला असाल. तरी तुमच अंत:करण बदलू शकणार नाही.”

हेही वाचा… “एप्रिल फूल बडे मियाँ”, टायगर श्रॉफचा प्रॅंक पडला त्याच्यावरच भारी; अक्षय कुमारच्या तोंडावर कोल्ड ड्रिंक उडताच…

दरम्यान करणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, करण जोहरचा ‘योद्धा’ चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला. यात सिद्धार्थ मल्हेत्राने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच सारा अली खान अभिनीत ‘ए वतन मेरे वतन’ स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट २१ मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा… “आज काय बनवू?”, अक्षराने पती अधिपतीला प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…

करण जोहरचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. तर आलिया भट्ट अभिनीत ‘जिगरा’ चित्रपटही लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar opinion on fillers botox lip surgies on social media went viral dvr