‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुखची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द आर्चीज’ चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करणार असून हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘द आर्चीज’चे नवे पोस्टर लॉन्च केल्यावर करणने अगस्त्य नंदा आणि सुहाना खान यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : सुशांत सिंह राजपूतच्या स्मृतिदिनानिमित्त रिया चक्रवर्तीने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; नेटकरी संतापून म्हणाले “एवढा ढोंगीपणा…”

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

करण जोहर अगस्त्य नंदा आणि सुहाना खानचे कौतुक करताना लिहितो की, “बालपणी ज्या मुलांना मी मांडीवर खेळवले होते, ती सगळी मुलं आज आयुष्याच्या नव्या वाटेवर एक नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज होत आहेत. कधीकधी विश्वास होत नाही ही मुलं किती लवकर मोठी होतात. सुहानासह या सगळ्या मुलांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा”

हेही वाचा : Video : महेश मांजरेकरांच्या लेकीची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक; म्हणाले “सई मराठी आहे म्हणून…”

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द आर्चीज’चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा असे नवोदित कलाकार दिसत आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम ब्राझीलमध्ये १६ ते १८ जूनला होणाऱ्या नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. यावेळी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर १६ जून रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader