करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व मागच्या आठवड्यात सुरू झाले. या पर्वातील पहिले पाहुणे अभिनेता रणवीर सिंह व त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण होते. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल केलं गेलं. ज्याचं कारण होतं दीपिकाने केलेलं एक वक्तव्य. दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना आता करण जोहरने उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिका पदुकोण काय म्हणाली होती?

दीपिका पदुकोणने रणवीर आयुष्यात आल्यावरही आपण इतरांना भेटत असल्याचं म्हटलं होतं. “आधीच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यावर मी काही काळ सिंगल राहायचं ठरवलं होतं, कारण ती नाती माझ्यासाठी खूप कठीण राहिली होती. त्यानंतर माझ्या आयुष्यात रणवीर आला, मात्र त्याने मला प्रपोज करेपर्यंत मी त्याला नात्याबद्दल कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती. तेव्हा आम्ही योग्य जोडीदार शोधण्यासाठी इतरांना भेटत होतो व काही पर्याय बघत होतो. पण जेव्हा मी इतरांना भेटायचे, तेव्हा माझ्या डोक्यात सतत रणवीरचाच विचार यायचा,” असं दीपिका म्हणाली होती.

रणवीर सिंहने अतरंगी कपडे घालणं का बंद केलं? दीपिकाचा उल्लेख करत म्हणाला, “मी आयुष्यात…”

या विधानामुळे दीपिका झाली ट्रोल

दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये केलेल्या या विधानाची एक क्लिप व्हायरल झाली आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काही ट्रोलर्सनी तिच्या आधीच्या रिलेशनशिपवरून तिच्यावर टीका केली तर अनेकांनी तिला दुतोंडी आणि रणवीरची फसवणूक करणारी म्हटलं. दीपिकाने रणवीरआधी ज्यांना डेट केलं होतं, त्यांच्याबरोबरचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत अनेकांनी मीमही बनवले.

‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…

करण जोहरने ट्रोलर्सना दिलं उत्तर

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या ट्रोलिंगने काहीच साध्य होणार नाही, असं करण म्हणाला आहे. “तुम्हाला जे करायचे आहे ते करा कारण ट्रोलिंगकडे कोणी लक्ष देत नाहीये. ट्रोलिंग करून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये,” अशा शब्दांत करणने ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar reaction on deepika padukone trolling after over relationship statement in coffee with karan ranveer singh hrc
Show comments