चित्रपटांचा अनेकदा समाजावर प्रभाव पडतो. मग ती एखाद्या कलाकाराची हेअर स्टाईल असो वा एखाद्या चित्रपटातील डायलॉग. काही चित्रपटांचा समाजावर खोलवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते.

रणबीर कपूरच्या चित्रपटातील ‘ते’ गाणे ऐकले अन्….

आता असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रणबीर कपूरचा ‘ये दिल है मुश्किल’ हा चित्रपट २०१६ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘चन्ना मेरेया’ हे गाणे चांगलेच गाजले होते. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्लीमध्ये एका लग्नात डीजेने ‘चन्ना मेरेया’ हे गाणे लावले. हे गाणे ऐकल्यानंतर जो नवरा मुलगा होता, त्याला त्याच्या भूतकाळातील नात्याची आठवण झाली आणि त्याने ते लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला, यामुळे सगळ्यांना धक्का बसला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष बाब म्हणजे ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत विश्वास बसत नसल्याच्या आशयाची कमेंट केली आहे.

करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूर व अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसले होते. ‘चन्ना मेरेया’ या गाण्यात रणबीर कपूरच्या भावना व्यक्त करणारे गाणे आहे. हे गाणे अनेकांना भावुक करते.

दरम्यान, करण जोहर निर्मित ‘केसरी : चाप्टर २’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दहा दिवसांत या चित्रपटाने ६० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, आर. माधवन व अनन्या पांड्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रणबीर कपूर त्याच्या विविध भूमिकांमुळे तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याची लेक राहादेखील मोठी चर्चेत असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. लवकरच रणबीर कपूर आलिया भट्टसह संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे.