‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाला २६ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. यंदाच्या सीझनच्या पहिल्या भागात दीपिका-रणवीर सहभागी झाले होते, तर दुसऱ्या भागात सनी व बॉबी या देओल बंधूंनी हजेरी लावली होती. या दोन्ही भागांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर तिसऱ्या भागात बॉलीवूड स्टारकिड्स सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना करणने वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतरही दिग्दर्शकांनी विशाखा सुभेदारला पाठवलं दिवाळीचं खास गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

करण जोहरचं वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री काजोलबरोबर जोरदार भांडण झालं होतं. या भांडणामुळे दोघेही एकमेकांशी जवळपास २ वर्ष बोलत नव्हते. काजोल-करणच्या २५ वर्षांच्या मैत्रीत अचानक कोणामुळे दुरावा आला. याबद्दल त्याने सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना सांगितलं. तसेच करणने हा किस्सा त्याच्या “ॲन अनसुटेबल बॉय” या बायोग्राफित सुद्धा लिहिला आहे.

अभिनेत्री काजोल आणि करण जोहर यांच्या जवळपास २५ वर्ष घट्ट मैत्री होती. दोघांनी ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’ या गाजलेल्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. परंतु, २०१६ प्रदर्शित होणाऱ्या अजय देवगणच्या ‘शिवाय’ चित्रपटामुळे करण आणि काजोलचं भांडण झालं.

हेही वाचा : “मी १०० टक्के चुकलो”, ‘आदिपुरुष’च्या लेखकाची अखेर कबुली; म्हणाला, “या चित्रपटासाठी ६०० कोटी…”

अजय देवगण प्रमुख भूमिकेत असलेला ‘शिवाय’ आणि करण जोहर दिग्दर्शित ‘ये दिल है मुश्किल’ हा चित्रपट २६ ऑक्टोबर २०१६ रोजी एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘ये दिल है मुश्किल’ हा चित्रपट शिवायबरोबर क्लॅश झाल्याने काजोल करणवर प्रचंड नाराज झाली होती. त्यांची २५ वर्षांची मैत्री एका क्षणात तुटली अन् पुढची दोन वर्ष तिने करणबरोबर जराही संवाद साधला नव्हता.

हेही वाचा : Video : “मराठी पोरी with मराठी बायको!”, ‘झिम्मा २’ मधील गाण्यावर सिद्धार्थ-मितालीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

करण जोहर पुढे सारा-अनन्याला म्हणाला, “माझी मुलं यश आणि रुहीचा जन्म झाल्यावर मी स्वत:हून काजोलला मेसेज केला होता. तिला दोघांचे सगळे फोटो पाठवले. ही माझी मुलं आहेत…तुझी इच्छा असल्यास मला जरूर रिप्लाय दे असं मी त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. यानंतर काजोलने समोरून मी तुझ्यासाठी प्रचंड आनंदी आहे…असं उत्तर मला दिलं होतं. पुढे, तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला मी गेलो होतो आणि आमच्यातील भांडणं मिटलं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar recalls old fight with kajol both breaks 25th year friendship beacause of ajay devgn movie sva 00