करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंहने ‘रॉकी रंधावा’ आणि अभिनेत्री आलिया भट्टने ‘राणी चॅटर्जी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणि एका नव्या गाण्याच्या लॉन्चसाठी करण जोहरने मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी करणने चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “समस्या असतील तर…”

दिग्दर्शक करण जोहरने चित्रपटाच्या शेवटी ‘कुडमयी’ या गाण्यातून रॉकी आणि रानीच्या लग्नाचा संपूर्ण सीन दाखवला आहे. या गाण्याच्या लॉन्चसाठी करणने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी दिग्दर्शकासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होते. या गाण्याचे शूटिंग जैसलमेरमध्ये झाल्याचे करणने यावेळी सांगितले.

हेही वाचा : “१०३ किलोवरून…”, सिद्धार्थ चांदेकरने पाच महिन्यांत कमी केले वजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “शरीराविषयी आदर…”

चित्रपटातील या लग्नसोहळ्याच्या गाण्याबद्दल सांगताना करण जोहर म्हणाला, “आलिया आणि रणबीर कपूरच्या खऱ्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत या गाण्याच्या शूटिंगचे शेड्यूल आम्ही तयार केले होते. आलियाच्या ‘रिअल’ लाइफ लग्नानंतर आम्ही या ‘रील’ लग्नाचे शूट केले. त्यामुळे आलियाने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केले. तिच्या खऱ्या लग्नाची मेहंदी माझ्या टीमने फक्त डार्क केली होती.” करणने केलेला खुलासा ऐकून उपस्थित सर्वजण हसू लागले.

हेही वाचा : ‘मैं निकला गड्डी लेके…’, २२ वर्षांनी नव्या रुपात प्रदर्शित झालं ‘गदर २’चं गाणं, नेटकरी म्हणाले, “चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक…”

आलिया या गाण्याबद्दल सांगताना म्हणाली, “माझ्या खऱ्या लग्नाचा लेहेंगा एकदम हलका होता पण, चित्रपटासाठी मी जड लेहेंगा परिधान केला होता. चित्रपटात सात फेरे घेताना आजूबाजूचे लोक म्हणत होते, ‘नवरा मुलगा पुढे चालणार’ मी त्यांना म्हणाले, नाही! मुलगी पुढे माझे नुकतेच लग्न झाले आहे.” दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ६० कोटींहून अधिक कमाई केली आहे.