बॉलीवूडमध्ये करण जोहर हे नाव सर्वाधिक चर्चेत असतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून करण जोहर ओळखला जातो. ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहेना’ अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी प्रेम कहानी’ अशा असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ९० च्या दशकातील त्याच्या प्रत्येक चित्रपटाचं आजही कौतुक केलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षात विशेषत: लॉकडाऊननंतर चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले. याबाबत चर्चा करण्यासाठी करण जोहर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या वेळी मनोरंजन सृष्टीत झालेले बदल, वैयक्तिक आयुष्य, दिग्दर्शनाची आवड यावर करणने भाष्य केले.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला हिंदीचा रिमेक म्हणणाऱ्यांना तेजश्री प्रधानने दिलं उत्तर; म्हणाली, “रिमेक असला तरीही…”

CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Aishwarya Rai and Preity Zinta
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाने ‘अनुपमा’फेम अभिनेत्याकडे केलेलं दुर्लक्ष; अनुभव सांगत म्हणाला…
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
maharashtra government to give 10 lakh subsidy to c grade marathi films
‘क’ दर्जाच्या मराठी चित्रपटांनाही आता अनुदान
mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
Swayam Parampje murder of construction businessman in Thane thane news
मैत्रिणीचे ‘ते’ छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून बांधकाम व्यवसायिकाची हत्या

करण जोहरला या कार्यक्रमात “तुझ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते अशा लोकांना तू काय सांगशील?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “सर, मी तुम्हाला खरं सांगू का? माझी सुद्धा माझ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप इच्छा असते. पण, मला माझ्या टीमकडून रिजेक्ट केलं जातं. त्यांनी कदाचित बॉम्बे वेलवेटमध्ये माझी भूमिका पाहिली असावी…मी जेव्हा जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये ही भूमिका मी करु शकतो असं बोलतो, तेव्हा संपूर्ण शांतता पसरते आणि माझे सहकारी विषय बदलतात, निघून जातात.”

हेही वाचा : Video: भारतीय सिनेमाबाबत करण जोहरशी दिलखुलास गप्पा, पाहा एक्सप्रेस अड्डा

“आता तुम्हाला कळालंच असेल माझा अभिनय प्रवास कसा आहे…माझी स्वत:ची इच्छा असूनही माझ्या कंपनीत मला अभिनेता म्हणून काम मिळत नाही. बॉम्बे वेलवेट २०१५ ला प्रदर्शित झाला होता आणि आज २०२३ आहे, तरीही मला कॅमेरा फेस करायची भीती वाटते. त्यानंतर मला एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही. एकातरी चित्रपटात काम करण्याची संधी मला नक्कीच मिळाली पाहिजे.” अशी खंत करण जोहरने या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.

हेही वाचा : चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; प्रकाश राज दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “तुम्हाला विनोद समजला…”

दरम्यान, ‘ये दिल है मुश्किल’नंतर तब्बल ७ वर्षांनी करण जोहरने ‘रॉकी और रानी प्रेम कहानी’ चित्रपटात दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. यामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.