चित्रपटसृष्टीत कलाकारांबरोबरच दिग्दर्शकांचे महत्त्वदेखील अनन्यसाधारण आहे. कारण- त्यांच्या नजरेतून चित्रपट साकारत असतो. अनेक दिग्दर्शक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. करण जोहर हा त्यापैकीच एक आहे. करण जोहरने ‘कभी अलविदा ना कहना’, ‘राझी, ‘शेरशाह’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘ये दिल है मुश्किल’ अशा अनेक चित्रपटांचे यशस्वीपणे दिग्दर्शन करीत बॉलीवूडमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. आता मात्र कोणत्याही चित्रपटामुळे नाही, तर करण जोहर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

फेय डिसूझा यांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने म्हटले आहे की, मी माझ्या शरीराबद्दल आनंदी नाही. मी जसा दिसतो, जसा बेढब आहे, त्याबाबत मला कायम अवघडल्यासारखे वाटते. मला माझ्या शरीराबद्दल न्यूनगंड आहे आणि त्यामुळे पूलमध्ये जाताना मला आत्मविश्वास वाटत नाही. लहान असतानादेखील मला असेच वाटत असल्याचे करण जोहरने या मुलाखतीत म्हटले आहे. याबाबत अधिक बोलताना त्याने म्हटले आहे, “मी माझ्या या विचारांवर ताबा मिळविण्याचा, स्वत:च्या शरीराबद्दल आत्मविश्वास वाढविण्याचा फार प्रयत्न केला; पण आतापर्यंत मला याचे उत्तर सापडले नाही. मी कितीही वजन कमी केले तरी मला कायम हेच वाटत राहते की, मी जाड दिसत आहे आणि त्यामुळे मी ढगळे कपडे वापरण्यास प्राधान्य देतो. मी आठ वर्षांचा असल्यापासून माझ्यासोबत हे होत आहे आणि त्यामध्ये आजपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. मला स्वत:च्याच शरीराची लाज वाटते.”

Surya Transit In Scorpio :
Surya Gochar : सूर्य करणार वृश्चिक राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार; मिळणार अपार धनलाभ अन् बक्कळ पैसा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Loksatta vyaktivedh Street artist Hanif Qureshi passed away
व्यक्तिवेध: हनीफ कुरेशी
Counselling Different behaviors by mother with two sisters
समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?
timothy hyman ra biography artist timothy hyman career journey
व्यक्तिवेध : टिमथी हायमन
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Loksatta bookmark My Father Brain A Life in the Shadow of Alzheimer Sandeep Johar
बुकमार्क: विस्मृतीच्या अंधारातील धडपड…

हेही वाचा: ‘इगो’मुळे जूही चावलाने माधुरी दीक्षितबरोबर ‘तो’ सुपरहिट सिनेमा नाकारलेला; कबुली देत म्हणाली, “नेहमीच आमची…”

पुढे बोलताना करण जोहर म्हणतो की, कोणत्याही थेरपी किंवा समुपदेशनानेही माझ्या या समस्या कमी झाल्या नाहीत. त्याचा मला सतत त्रास होत असतो. या सगळ्याचा माझ्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो. दोन वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले. माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये थांबणे माझ्यासाठी अवघडल्यासारखे झाले आणि मला पॅनिक अटॅक आला. तेव्हापासून मी समुपदेशनाचा आधार घेत आहे.

दरम्यान, करण जोहर लवकरच ‘बॅड न्यूज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. ‘बॅड न्यूज’मधील ‘तौबा तौबा’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, विकीच्या डान्सची चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. हृतिक रोशन, सलमान खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी विकी कौशलचे कौतुक केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे.