‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा ना कहेना’ अशा एकापेक्षा एका दर्जेदार कौटुंबिक चित्रपटांचं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे. करण आता अनेक विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधतो. लैंगिकता (सेक्शुअ‍ॅलिटी) या विषयावर अनेकदा करणने उघडपणे त्याच मत मांडलं आहे. परंतु, एकेकाळी करण याबद्दल कोणाशीही बोलायचा नाही. त्याने वैयक्तिक आयुष्यात शाहरुख खानबरोबर सर्वप्रथम सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल चर्चा केली होती. किंग खानने करणला कधीच परकेपणाची वागणूक दिली नाही. याविषयी दिग्दर्शकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : प्राजक्ता माळी आणि नितीन गडकरींची ग्रेट भेट! ‘या’ विषयांवर मारल्या गप्पा; अभिनेत्री म्हणाली, “त्यांच्या घरच्या…”

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”

करण जोहरचे आई-बाबादेखील त्याचे विचार समजू शकत नव्हते. अशावेळी दिग्दर्शकाला शाहरुख खानने मदत केली होती. सगळेजण त्याच्या त्याच्या स्त्रियांसारख्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करायचे. अशा सगळ्या परिस्थितीत शाहरुखने त्याला प्रचंड सांभाळून घेतलं. निखिल तनेजाच्या ‘बी अ मॅन यार’ या कार्यक्रमात करण जोहरने याबद्दल खुलासा केला आहे.

करण जोहर म्हणाला, “शाहरुख खान ही पहिली व्यक्ती आहे, ज्याने मला सांगितलं तू एकदम ठिक आहेस तुझ्यात काहीच दोष नाही. त्याचा जन्म आणि संगोपन अतिशय प्रगतशील वातावरणात झालेलं आहे. शाहरुखला थिएटरचा अनुभव असल्याने त्याने माझ्यासारख्या असंख्या लोकांबरोबर यापूर्वी काम केलं होतं. काही गोष्टी माझे पालक समजू शकत नव्हते त्या गोष्टी शाहरुख खानने योग्यप्रकारे हाताळल्या. माझं स्त्रियांसारखं वागणं-बोलणं हळुहळू सर्वांसमोर येत होतं. तेव्हा अनेकांनी केवळ माझी चेष्टा केली.”

हेही वाचा : Video : दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; म्हणाली, “आदरपूर्वक आणि संयमानं…”

करण पुढे म्हणाला, “माझं चालणं-बोलणं अगदी प्रत्येक गोष्टीबद्दल लोक चर्चा करायचे. त्या काळात शाहरुखने माझ्या मनात केव्हाच कमीपणाची भावना येऊ दिली नाही. त्याने नेहमी मला पाठिंबा दिला. त्याने नेहमी माझ्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.”

हेही वाचा : लग्नाआधी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखने घेतलं नवीन घर? दारावरच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

“शाहरुखचा समजूतदारपणा पाहून मी माझ्या लैंगिकतेबद्दल सर्वप्रथम त्याच्याशी संवाद साधला. लोकं चिडवायची म्हणून दहावीत असताना मी एका मुलीच्या प्रेमात असल्याचं खोटं नाटक सुद्धा केलं होतं. कालांतराने माझं व्यक्तिमत्त्व आणि लैंगिकतेबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी शाहरुखला सांगितल्या. तो कायम माझ्यासाठी एक आधारस्तंभ होता आणि कायम राहणार”, असं करण जोहरने सांगितलं.