बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याच्या आयुष्यातील आनंदाच्या घटना तसंच मुलांसोबतची त्याची दंगा मस्ती बरंच काही करण त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या करणने केलेल्या पोस्टमुळे नेटकरी भावूक झाले आहेत. वडील यश जोहर यांच्या जन्मदिनानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत काय म्हणाला करण जोहर, जाणून घेऊयात.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”

‘कभी खुशी कभी गम’ ,’ कुछ कुछ होता है’ या आणि अशा अनेक सुपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी करणला जोहरला ओळखलं जातं. करण बॉलीवूडमध्ये यशस्वी सिनेदिग्दर्शक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र करणचे वडील यश जोहर हे देखील दिग्दर्शक होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत करणनेदेखील सिनेविश्वात नाव कमविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वीदेखील झाला. आज करणने त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ केलेल्या पोस्टवर नेटकरी भावूक झाले आहेत. जन्मदिनानिमित्ताने करणने वडिलांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने प्रत्येक फोटोला हटके असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत करण म्हणतो की, “आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे.”

करण लिहितो की, “हा पहिला फोटो! यात आम्ही तिघं जण एकत्र येत पूर्ण कुटुंब तयार झालं आहे. आपल्या माणसांची मिठी खूप खास असते. हे असे कौटुंबिक प्रेम मला माझ्या आयुष्यात मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हा फोटो माझ्या ३० व्या वाढदिवसाचा आहे, त्यावेळी मी माझा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट अवघ्या जगाने पाहिला, त्यावेळी माझ्या वडिलांना माझा खूप अभिमान वाटला असेल. चौथ्या फोटोला करणने कॅप्शन दिलंय की, हा फोटो म्हणजे मी त्यांच्याबरोबर रंगमंचावर उभा होतो तेव्हाचा क्षण… हा क्षण मी माझ्या हृदयात कायमचा कोरलेला आहे.”

पुढे करण असंही म्हणतो की, “बाबा, असा एकही दिवस जात नाही की तुझी आठवण आली नाही. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात मला तुमची खूप आठवण येते. माझ्या आयुष्याला, माझ्या करियरयोग्य दिशा देण्याचं काम तुम्ही कायमच केलंत. मला वेळोवेळी पुढे जाण्याचं प्रोत्साहन दिलंत आणि म्हणून मी आज यशस्वी आहे. आजवरच्या माझ्या या यशामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. तुमचे खूप खूप आभार बाबा..” अशी भावनिक श्रद्धांजली करणने त्याच्या वडिलांना वाहिली आहे. करणने पोस्ट केलेल्या या फोटोंना दिया मिर्झा म्हणते की, “यशजी हे मला या इंडस्ट्रीत भेटलेले सर्वात प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहेत, त्यांची आठवण कायम स्मरणात राहील”, अशी कमेंट करत दियाने यश जोहर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Story img Loader