करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. या वरचेवर त्याचे काही मजेदार फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करतो. त्याने त्याच्या घरातीलही काही व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना त्याचं घर कसं आहे ते दाखवलं आहे. पण आता त्याने त्याच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
करणची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन खूपच आकर्षक आहे. सर्व सोयी सुविधा आहेत. ते त्याचे दुसरे घर आहे असंही म्हणायला हरकत नाही. व्हॅनिटी व्हॅनमध्ये एंट्री केली की एक मोठा आरामदायक सोफा तिथे ठेवलेला आहे. समोर एक शेल्फ आहे ज्याच्यात करणे त्याला लागणाऱ्या वस्तू ठेवल्या आहेत. त्याचे शूज आणि कपडे ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कपाट आहे.आणखीन थोडं आत गेल्यावर एक छोटसं किचनही आहे.
आणखी वाचा : Video: काजोलबरोबर रोमान्स करणाऱ्या मराठमोळ्या गश्मीर महाजनीची सर्वत्र चर्चा; नेटकरी म्हणाले, “शाहरुखपेक्षा…”
करणने इंस्टाग्रामवर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचा एक छोटा व्लॉग शेअर केला आहे. यात तो स्वतःही दिसत आहे. या व्हिडीओत त्याला व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोणत्या पाच गोष्टी लागतात हे त्याने सांगितलं. तो म्हणाला, “चष्मा ठेवण्यासाठी मला खूप जागा लागते. मला अंगठ्यांची आवड आहे. त्यामुळे अंगठ्या आणि माझ्या इतर अॅक्सेसरीजसाठीही मला वेगळी जागा हवी असते. मला व्हॅनिटीमध्ये आरामदायी उशाही हव्या असतात.”
हेही वाचा : करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण केल्याचा जान्हवी कपूरला पश्चाताप? म्हणाली, “त्यावेळी मला…”
पुढे त्याने सांगितलं, “माझी प्रोडक्शन डिझायनर अमृताने माझ्या स्वेटशर्टमधून या सगळ्या उशा डिझाइन केल्या आहेत. त्यासाठी तिने माझे बरेच स्वेटशर्ट फाडले आहेत आणि त्यातून या छान उशा बनवल्या आहेत. याशिवाय मला माझ्या जॅकेटसाठीही जागा लागते. त्या व्यतिरिक्त एक कॉफी मशीनही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असतं. कारण मला भेटायला अनेक पाहुणे येत असतात आणि त्यांना द्यायला मी कॉफी बनवतो.” करणच्या व्हॅनिटी व्हॅनच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.