भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे करण जोहर आहे. गेली अनेक वर्षे बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या दिग्दर्शक व निर्मात्याशी इंडियन एक्सप्रेसचे एक्झ्युकेटिव्ह एडिटर अनंत गोएंका यांनी ‘एक्सप्रेस अड्डा’च्या माध्यमातून संवाद साधला. करण जोहरने हिंदी सिनेमांचं बदलतं स्वरुप, बदलते विषय, वेब सीरिज अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करण जोहर नुकताच त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. या कार्यक्रमात करण जोहरने ‘गदर २’बद्दलही भाष्य केलं. करण याविषयी म्हणाला, “गदर २ या चित्रपटाने सगळ्यांची झोप उडवली आहे. २००१ मध्ये याच्या पहिल्या भागालाही असंच अभूतपूर्व यश मिळालं होतं आता पुन्हा २०२३ मध्येसुद्धा याचा सीक्वल नवनवे विक्रम रचत आहे. मी खासकरून सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या मालकांसाठी खुश आहे.”

आणखी वाचा : ‘क्लास’ वेबसीरिजमधील ‘तो’ न्यूड सीन कसा शूट केला? इंटीमसी को-ऑर्डिनेटर आस्था खन्नाने सांगितला किस्सा

याबरोबरच करणने बॉलिवूडवर सातत्याने होणाऱ्या टिकेवरही भाष्य केलं आहे. करण म्हणाला, “चित्रपटसृष्टीला खडतर दिवस पहावे लागले आहेत हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधीसुद्धा कित्येक वाईट दिवस आम्ही पाहिले आहेत. याचा अर्थ ‘बॉलिवूडवर बहिष्कार घालावा’ किंवा ‘बॉलिवूड संपलं’ असा होत नाही, किंवा याचा अर्थ आता या चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचं वर्चस्व आहे असाही होत नाही. दक्षिणेतील चित्रपट हे उत्तम आणि अद्भुत असतात यात काहीच शंका नाही. मी स्वतः ‘बाहुबली’सारखा चित्रपट उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रेझेंट केला.”

याबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींवर करणने चर्चा केली. करणने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या माध्यमातून तब्बल ८ वर्षांनी कमबॅक केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक कमाई करणारा रोमॅंटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar speaks about gadar 2 success and bollywood progress at express adda avn
Show comments