आजवर कलाक्षेत्रामधील अनेक अभिनेत्रींनी बॉडी शेमिंगबाबत भाष्य केलं. सोनाक्षी सिन्हा, हुमा खुरेशी, नेहा धुपिया अशा कित्येक अभिनेत्री आहेत ज्यांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. अभिनेत्रीच नव्हे तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरलाही बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करणने याबाबत भाष्य केलं. बॉडी शेमिंगचा कसा सामना केला? त्याला आलेल्या अनुभवाबाबत करणने यावेळी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं अन्…” स्वप्निल जोशीसह इंटिमेट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरचं वक्तव्य

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाच्या टॉक शोमध्ये करणने हजेरी लावली होती. वजन वाढल्यामुळे सतत लोक बोलायचे असं करणने या शोमध्ये सांगितलं. करण म्हणाला, “माझं वजन अजूनही वाढलेलंच आहे. मला वजन वाढीवरून सतत बोलण्यात आलं ते अजूनही मी विसरू शकलो नाही. मी अंगालगत फिट असणारे कपडे परिधान करू शकत नाही. एखादी छोटीशी भूमिका असली तरी माझ्या शारिरीक वजनाकडे माझं आधी लक्ष जातं. आता मी फक्त लूज कपडे परिधान करतो. खरं तर अंगालगत असणारे कपडे मी परिधान करूच शकत नाही.”

पुढे तो म्हणाला, “टी-शर्ट किंवा शर्ट अजूनही परिधान करायचं म्हटलं की मी अस्वस्थ होतो. अशाप्रकारचे कपडे परिधान करण्यासाठी माझी तशी कंबर व शरीरयष्टी नाही. जेव्हा मी टी-शर्ट बदलत असतो तेव्हा मला कोणी बघत तर नाही ना हा विचार मला सतावत असतो.”

आणखी वाचा – “माझा बॉयफ्रेंड होता तरीही…” अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा अफेअरबाबत खुलासा

एखादा पुरस्कार सोहळा, कार्यक्रम असो वा शो करण अगदी लूज कपडे परिधान करताना दिसतो. त्याची फॅशन ही इतर मंडळींपेक्षा अगदी हटके असते. लूज कपडे परिधान करण्यामागचं करणचं खरं कारण आता समोर आलं आहे.