सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे कलाकारांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असातात. एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना जेवढी उत्सुकता तेवढीच उत्सुकता त्यांना अभिनेत्यांच्या जीवनशैलीबद्दलही असते. कलाकारांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा आउटफिट यांकडे नेटकरी बारकाईने निरीक्षण करतात. बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याचा फॅशन सेन्स प्रेक्षकांचे कायमच लक्ष वेधून घेतो. करण जोहर त्याच्या सुपरहिट सिनेमांव्यतिरिक्त ओळखला जातो तो त्याच्या फॅशन सेन्समुळे. करणच्या जीवनशैलीमधील त्याच्या कपड्यांच्याबाबत कायमच चर्चा होत असतात. विविध रंगसंगतींचा वापर करून तयार केलेले डिझायनर ड्रेसेस, त्यावर वापरण्यात येणारे गॉगल व शूज या करणच्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर कायमच ट्रेंड होत असतात.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

करणच्या मुलांचे मजेशीर उत्तर

सध्या करणने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण आणि त्याची दोन्ही जुळी मुले यश व रुही यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. या व्हिडीओमध्ये करण आणि रुही व यश यांच्यातील गोड भांडणं पाहायला मिळत आहेत. रुही व यश यांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगााची पॅन्ट घातली आहे. त्यांना करण म्हणतो, “अरेच्चा! तुम्ही दोघंही या ड्रेसमध्ये खरंच जुळे दिसतायत. मला खूप आवडलाय, तुम्ही जो काही ड्रेस घातलाय तो.” त्यावर त्याची गोड मुलगी रुही म्हणते, “तू असे ड्रेस ऑफिसला जाताना का नाही घालत?” त्यावर करण दोघांनाही प्रतिप्रश्न विचारतो, “तुम्हाला माझा फॅशन सेन्स आवडत नाही का?” वडिलांच्या या प्रश्नाला दोन्ही मुलं मान हलवून ‘नाही’, असे उत्तर देतात.

हेही वाचा- Video: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचा लेकीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

पुढे करणची मुलगी रुही म्हणते, “तुझे ड्रेसेस आम्हाला नाइट सुटसारखे वाटतात.” तिच्या या बोलण्यावर करण म्हणतो, “नाही बेटा, याला एथलेजर, असं म्हणतात.” त्यावर यश व रुही दोघंही डोक्यावर हात मारून घेतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बॉलीवूडमध्ये अनेकदा करणच्या फॅशन सेन्सला नावं ठेवली जातात आणि त्यावर विनोददेखील केले जातात. मात्र, आता नेटकऱ्यांप्रमाणेच त्याच्या मुलांनादेखील आपल्या वडिलांचा फॅशन सेन्स आवडत नाही, असे या व्हिडीओमधून दिसून येते.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांच्या नातीची गगनभरारी! भारतातील सर्वोच्च संस्थेत शिक्षणासाठी मिळवला प्रवेश, फोटो पोस्ट करत म्हणाली…

बाप-लेकांच्या या गोड भांडणावर कलाकार आणि चाहत्यांनीदेखील कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. बिपाशा बसू, मनीष मल्होत्रा व माही कपूर या सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर हार्टचा इमोजी टाकलाय. करण कायमच त्याच्या मुलांसोबतचे मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असतो. करणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याची दोन्ही मुलं रुही व यश यांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. करणने २०१७ मध्ये यश आणि रुही यांचे पालकत्व स्वीकारले असून, तो आपल्या दोन्ही मुलांची काळजी घेतो.

Story img Loader