सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे कलाकारांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असातात. एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना जेवढी उत्सुकता तेवढीच उत्सुकता त्यांना अभिनेत्यांच्या जीवनशैलीबद्दलही असते. कलाकारांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा आउटफिट यांकडे नेटकरी बारकाईने निरीक्षण करतात. बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याचा फॅशन सेन्स प्रेक्षकांचे कायमच लक्ष वेधून घेतो. करण जोहर त्याच्या सुपरहिट सिनेमांव्यतिरिक्त ओळखला जातो तो त्याच्या फॅशन सेन्समुळे. करणच्या जीवनशैलीमधील त्याच्या कपड्यांच्याबाबत कायमच चर्चा होत असतात. विविध रंगसंगतींचा वापर करून तयार केलेले डिझायनर ड्रेसेस, त्यावर वापरण्यात येणारे गॉगल व शूज या करणच्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर कायमच ट्रेंड होत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा