बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक करण जोहर अनेकदा बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करताना दिसतो. कधी स्वतःचा शो ‘कॉफी विथ करण’ तर कधी दुसऱ्या एखाद्या रिअलिटी शोमध्ये तो सेलिब्रेटींचे किस्से शेअर करताना दिसतो. मात्र, करणने यंदा स्वत:बद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. अमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे करण जोहर खूप नाराज झाला होता. आणि त्या नाराजेपोटी तो देश सोडून लंडनला गेला होता. त्यांच्या ‘अ युनिक बॉय’ या पुस्तकात याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “सोशल मीडियावर एकमेकांविरोधात…”; नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याच्या भावाला कोर्टाचा आदेश

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah statement on Atal Bihari Vajpayee
वाजपेयींच्या मार्गानेच जायला हवे होते!
indian-constituation
संविधानभान: आदिवासी (तुमच्यासाठी) नाचणार नाहीत!
Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन

‘एक अनोखा बॉय’ या आत्मचरित्रात करण म्हणाला, की ‘कुछ कुछ होता है’ हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. त्याच्याकडे पैसे, कार, घर आणि महागडी घड्याळे आणि कपडे होते. जेव्हा हा चित्रपट हिट झाला तेव्हा त्याला पुढे ‘कभी खुशी कभी गम’ बनवण्याची प्रेरणा मिळाली.

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, करीना कपूर, जया बच्चन आणि हृतिक रोशन यांना अशी मोठी स्टार कास्ट या चित्रपटात होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडेल आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल, अशी आशा करणला होती. मात्र याआधी आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘लगान’ व्यतिरिक्त सनी देओलचा ‘गदर’ही याच वर्षी रिलीज झाला होता. ‘लगान’ आणि ‘गदर’ या दोन्ही चित्रपटांना लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. असे चित्रपट हिट कसे होऊ शकतात याचे करणला आश्चर्य वाटले.

हेही वाचा- “मुलींच्या भावनांशी खेळणाऱ्या रणबीरला…” आलियाचा चुलत भाऊ इम्रान हाश्मीने दीपिका आणि कतरीनाला दिला होता सल्ला

समीक्षक देखील कभी खुशी कभी गम चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया देत होते, चित्रपट पाहिल्यानंतर करणच्या तोंडावर कौतुक केले मात्र. नंतर त्यांनी नकारात्मक रेटिंग दिले. त्यामुळे करण घाबरला होता. हा चित्रपट करून आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली असे त्याला वाटले.
एकीकडे ‘लगान’ची चर्चा होती. दुसरीकडे, ‘कभी खुशी कभी गम’ फ्लॉप झाल्यामुळे करण चिंतेत होता. मात्र, तसे झाले नाही. ‘लगान’ आणि ‘गदर’च्या तुफान चित्रपटात ‘कभी खुशी कभी गमने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पण जेव्हा पुरस्काराचा विषय आला तेव्हा ‘लगान’ ऑस्करसाठी नामांकन झाले. अवॉर्ड शोमध्ये ‘लगान’ची धूम होती. दुसरीकडे करणला अवॉर्ड शोपासून दूर ठेवले जात होते. यामुळे नाराज होऊन तो लंडनला गेला.

करण म्हणतो की, त्याचा ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचू शकला नसला तरी त्याने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. आपल्या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्याने तो अनेक दिवस दुःखी होता. पण कभी खुशी कभी गमने प्रेक्षकांची मने जिंकली आणि करणच्या लक्षात आले की त्याने चांगला चित्रपट बनवला आहे.