‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटामार्फत करण जोहरने न्यू कमर्स आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राला लॉन्च केलं. हा चित्रपट २०१२ रोजी प्रदर्शित झाला असून प्रचंड लोकप्रिय ठरला होता. तर २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इअर-२’चित्रपटामार्फत अनन्या पांडे आणि तारा सुतारियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. टायगर श्रॉफने या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. अशातच आता ‘स्टुडंट ऑफ द इअर-३’ ची चर्चा सुरू आहे.
करण जोहरने चंदीगडमधील सिनेवेश्चर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (CIFF) दरम्यान ‘स्टुडंट ऑफ द इअर-३’ बद्दल खुलासा केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, रीमा माया यांनी दिग्दर्शित केलेल्या त्याच्या आगामी वेब सीरिजचाही त्याने उल्लेख केला.
नवीन दिग्दर्शक आणि लेखकांसह काम करण्याबद्दल बोलताना करणने रीमाचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की, “रीमा माया ‘स्टुडंट ऑफ द इअर’च्या डिजिटल वर्जनचं दिग्दर्शन करणार आहे. पण हे वर्जन तिच्याप्रमाणे असेल. मला असं वाटत की ही तिची स्वत:ची सीरिज असावी.”
हेही वाचा… “कितीही बोटॉक्स केलं तरी…” फिलर्स आणि सर्जरीबद्दल करण जोहर स्पष्टच म्हणाला…
रीमा, एक पुरस्कार विजेती लेखिका-दिग्दर्शिका आणि कॅटनिप प्रॉडक्शन हाऊसची सह-संस्थापक आहे. जी तिच्या स्वतंत्र चित्रपट निर्मितीसाठी ओळखली जाते. ‘कॉउंटरफेट कुंकू’सह तिच्या लघुपटांना सनडान्ससारख्या चित्रपट महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिचं अलीकडील काम, ‘नॉक्टर्नल बर्गर’ सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये प्रीमियर झालं होतं. तिने नेटफ्लिक्स, रेड बुल आणि बोटसारख्या ब्रँडसाठी व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत.
या वेब सीरिजमध्ये करण जोहर शनाया कपूरला कास्ट करण्याची चर्चादेखील सुरू होती. शनाया, मोहनलाल अभिनीत ‘वृषभा’ चित्रपटमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असताना ओटीटीमध्येही ती पदार्पण करणार आहे.
हेही वाचा… “आज काय बनवू?”, अक्षराने पती अधिपतीला प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…
दरम्यान, करण जोहरचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. तर आलिया भट्ट अभिनीत ‘जिगरा’चित्रपटही लवकरचं प्रदर्शित होणार आहे.