बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर सातत्याने चर्चेत असतो. आपली मत तो परखडपणे मांडत असतो. त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात तो बॉलिवूडच्या कलाकारांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेत असतो. करण सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तो फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. करणला दोन जुळी मुले आहेत. नुकताच त्याने आपल्या मुलांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्याची मुलं खेळताना दिसत आहेत, मुलं त्याला म्हणतात ‘आम्ही तुम्हाला एका कार्यक्रमात गाताने पहिले तुम्ही खूप खराब गात होतात’. त्यावर करण जोहर म्हणाला, ‘मी खूप चांगला गातो, तुम्हाला ऐकायचे आहे का’? असं म्हणत करणने ‘अभि ना जाओ छोडकर’ हे गाणे म्हणण्यास सुरवात केली आणि त्याच्या मुलांनी कानावर हात ठेवले. त्याच्या या व्हिडीओवर त्याने कॅप्शन दिला आहे की ‘माझ्या घरात माझ्या सुरेल आवाजाचे चाहते नाहीत’ त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अमित ठाकरेंना महेश मांजरेकर ‘या’ चित्रपटातून करणार होते लाँच; राज ठाकरे म्हणाले, “बाप बेटे दोघे… “
करणने नुकतंच ट्विटरला रामराम ठोकला आहे. त्याच्या या कृतीवर विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना करण असं म्हणाला की ‘मला जे आवडते ते मला करायचे आहे. कॉफी विथ करण केल्याने मला आनंद होतो’. नुकताच प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. स्टारकिड्सना लाँच करतो हा आरोप त्याच्यावर सातत्याने होत असतो.
करणने आपल्या करियरची सुरवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. ‘कुछ कुछ होता हैं’ या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात आपले पाऊल ठेवले. ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘स्टुडन्ट ऑफ द ईअर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले होते. आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत तो चित्रपटांची निर्मितीदेखील करतो. त्याचे वडील यश जोहरदेखील प्रख्यात चित्रपट निर्माते होते.