काही दिवसांपूर्वी ‘डॉन ३’ चित्रपटाची घोषणा झाली, त्याचा टीझरही समोर आला असून यात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराने दीपिका पदुकोणला मेसेज केला होता. करण सध्या ‘हम रहें ना रहें हम’ मध्ये नकारात्मक भूमिका करत आहे. रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असल्याने त्याने ‘डॉन ३’ मध्ये भूमिका मागण्यासाठी दीपिकाशी संपर्क साधल्याचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडील धर्मेंद्र अन् शबाना आझमींचा किसिंग सीन पाहिल्यावर लेक ईशा देओलने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाली “ते दोघेही…”

एका वेबसाइटशी बोलताना करणवीर म्हणाला, “जेव्हा मला कळलं की रणवीर सिंग डॉन ३ मध्ये मुख्य भूमिका करत आहे, तेव्हा मी त्याच्या विरुद्ध खलनायकाची भूमिका करण्यास उत्सुक होतो. पण मी फरहान अख्तर किंवा त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधील कोणालाही ओळखत नाही. म्हणून मी रणवीरची पत्नी दीपिकाला मेसेज केला. मला वाटलं नशीब आजमावून पाहायला काय हरकत आहे. दीपिका आणि मी एकमेकांना ओळखतो, पण फार भेटत नाही. मी तिला एक मेसेज केला आणि चित्रपटाचा भाग बनण्याची माझी इच्छा व्यक्त केली.”

“काँग्रेसची १००-१५० माणसं मला घेराव…”, शरद पोंक्षेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; राष्ट्रवादीचा उल्लेख करत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे…”

करणने मेसेज केल्यावर दीपिकाने त्याला रिप्लाय केला. तिने त्याला कास्टिंग डायरेक्टरचा नंबर पाठवला आणि म्हणाली, “मी तुला फार मदत करू शकत नाही, परंतु चित्रपट बनवणाऱ्या बॅनरसाठी कास्टिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव मी सांगून मदत करू शकते”. करण म्हणाला, “योगायोगाने माझ्याकडे त्या व्यक्तीचा नंबर होता. मी त्याला मेसेज केला आणि माझ्यासाठी कोणती भूमिका असेल तर कळवा, मला काम करायला आवडेल, असं सांगितलं.”

दरम्यान, करणवीर बोहरा सध्या ‘हम रहें ना रहें हम’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारतोय. सोमवारी २८ ऑगस्ट रोजी त्याचा ४१ वा वाढदिवस झाला. त्याने मध्यरात्री त्याच्या शोमधील कलाकारांसोबत वाढदिवस साजरा केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karanvir bohra texted deepika padukone for role in don 3 as ranveer singh is lead actor hrc