Kareena Kapoor At Taimur School Event : करीना कपूर खान तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिचं व्यक्तिमत्व ‘जब वी मेट’च्या गीतसारखं आहे असं म्हणत असते. तिला बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखलं जातं. याशिवाय असंख्य सिनेप्रेमी ओव्हरअ‍ॅक्टिंग फक्त करीनालाच सूट होते असंही म्हणतात. यावरून अभिनेत्रीचा चाहतावर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. सध्या करीना वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीना कपूर ( Kareena Kapoor ) व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर ‘धीरुभाई अंबानी स्कूल’मध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. नुकताच या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केला होता. यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. सध्या या स्टारकिड्सचे शाळेत रंगमंचावर परफॉर्मन्स सादर करतानाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करीनाचा लेक तैमूर सुद्धा आपल्या शालेय मित्रमंडळींबरोबर मंचावर थिरकत होता. यावेळी लेकाला पाहताच करीनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हेही वाचा : “आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”

तैमूरला डान्स करताना पाहून करीना झाली खूश

कोणत्याही आईसाठी आपल्या मुलाला रंगमंचावर लाइव्ह परफॉर्म करताना पाहणं ही मोठी गोष्ट असते. करीनाच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. यापूर्वी लहान मुलगा जेह आणि आता तैमूरला डान्स करताना पाहून ती ( Kareena Kapoor ) भलतीच आनंदी झाली होती. ती गोड स्मितहास्य करत तैमूर डान्स करतानाचा व्हिडीओ काढत होती. याशिवाय मध्येच उठून करीनाने आपल्या लेकाला हातवारे केल्याचंही पाहायला मिळालं. तैमूर डान्स करेपर्यंत करण जोहर आणि करीना त्याला प्रोत्साहन देत होते, त्याला हातवारे करून ‘Hiii’ करत होते. यावेळी बाजूला बसलेला सैफ सुद्धा मोठ्या कौतुकाने लेकाचा डान्स पाहत होता.

हेही वाचा : तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”

हेही वाचा : दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी

करीनाचे मुलाला चिअर करतानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. यावर एक कमेंट एकसारखीच आलीये, ती म्हणजे “आज आम्ही ‘कभी खुशी कभी गम’च्या पूजाला ( Poo) नव्हे तर अंजलीला पाहतोय.” या चित्रपटात करीनाने ग्लॅमरस पूजाची भूमिका साकारली होती तर, काजोलचं अंजली हे पात्र असंच हसून खेळून आयुष्य जगणारं होतं. यामुळेच नेटकऱ्यांना करीनाचा स्कूल इव्हेंटमधील आनंद पाहून K3G मधली अंजली आठवत आहे. तर, अनेकांनी करीनाने ( Kareena Kapoor ) दिलखुलासपणे आपल्या मुलाला पाठिंबा दिल्याने तिचं कौतुक देखील केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor enjoys taimur school event performance become his biggest cheerleader video viral sva 00