चाहत्याला आवडणारा एखादा कलाकार जर अचानक चाहत्यासमोर आला तर चाहते त्याच्याबरोबर बोलण्यासाठी, त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अनेकदा याचा कलाकारांना त्रास होतो मात्र ते तो दाखवत नाहीत. करिना कपूरच्या बाबतीतही एअरपोर्टवर अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे आहे.
आणखी वाचा : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल नवीन अपडेट, रणदीप हुड्डाने केली ‘ही’ मोठी घोषणा
विरल भयानीने शेअर केलेला तिचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यात दिसतं की, करिना कपूर परदेशात रवाना होण्यासाठी तिच्या गाडीतून एअरपोर्टवर आली. करिनाला एअरपोर्टवर पाहताच चाहत्यांनी तिच्याभोवती सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. एका व्यक्तीने तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, करीनाच्या रक्षकांनी त्या माणसाचा हात धरून झटकला. मात्र आपल्या इतक्या जवळ आलेल्या व्यक्तीला पाहून करीना कपूरही घाबरली.
करिनाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांनी इतक्या मर्यादा ओलांडल्या की त्यामुळे करीनाही अवस्थ झाली. इतकंच नव्हे तर तिच्या एका चाहत्याने करीनाची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला, तर कुणी सेल्फी काढण्यासाठी तिला जबरदस्ती करू लागलं. या सगळ्या प्रकारामुळे करीना घाबरली आणि तिथून एअरपोर्टच्या आत निघून गेली. एवढे सगळे करूनही करिनाने आपला संयम अजिबात सोडला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. करीना कपूर कूल लूकमध्ये एअरपोर्टवर पोहोचली. यावेळी तिने पांढरा स्वेटर, पांढरा टी-शर्ट आणि पांढऱ्या ट्रॅकपॅंट परिधान केली होती.
हेही वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या ओटीटी रिलीजसंबंधित मोठी घोषणा, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार चित्रपट प्रदर्शित
मीडिया रिपोर्टनुसार, करिना दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे. हा चित्रपट एक मर्डर थ्रिलर आहे. या चित्रपटाची निर्मितीदेखील करिना कपूर करत आहे. याशिवाय करिना ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ च्या हिंदी व्हर्जनमध्ये दिसणार आहे.