बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी मध्यरात्री दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडलेल्या घटनेनंतर मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अशात सध्या सोशल मीडियावर घटनेनंतरचा सैफच्या घराबाहेरील एक व्हिडीओ समोर आला आहे.

दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाल्याने त्याची पत्नी करीना कपूर खान मोठ्या चिंतेत आहे. या घटनेनंतर करीना आणि घरातील मदतनीस (मोलकरीण) दोघीही घराबाहेर आल्या होत्या. तसेच जमलेल्या अन्य व्यक्तींना याची माहिती सांगत होत्या. घटनेनंतर घराबाहेरील परिस्थितीचा व्हिडीओ समोर आला आहे. विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Aamir Khan
“सलग आठ चित्रपट फ्लॉप…”, आमिर खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले, “करिअर संपले…”
Nupur Shikhare Ira Khan Trending Marathi Reel Viral
Video: ‘आले तुफान किती…’ म्हणत नुपूर शिखरेचं पत्नी आयरा खानबरोबर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना

हेही वाचा : हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…

व्हिडीओमध्ये करीना अस्वस्थ होऊन घराबाहेर फेऱ्या मारताना दिसत आहे. तसेच अन्य व्यक्तींशी संवाद साधत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि सफेद रंगाची पँट घातली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर नेटकऱ्यांनीदेखील यावर अनेक कमेंट केल्या आहेत. सैफ आणि करीनाच्या चाहत्यांनी दोघांविषयी काळजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, वांद्रे येथील सैफच्या राहत्या घरी ही घटना घडली. दरोडेखोरांनी थेट घरात प्रवेश केला, त्यावेळी घरात करीना, तैमुर आणि जेहदेखील होते. या चोरांची मदतनीस (मोलकरीण) बरोबर भांडणं झाली, तिने आरडाओरडा केला, त्यावेळी सैफ तेथे पोहचला. आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी त्याने चोरांशी दोन हात केले. यावेळी त्याच्यावर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात सैफच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेविश्वातील कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच राजकीय वर्तुळातही या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यासह दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरनेही पोस्ट शेअर करत सैफबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Saif Ali khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला, प्रियांका चतुर्वेदी म्हणतात, “वांद्रे येथील सेलिब्रिटी आणि….”

सदर घटनेनंतर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या घरी धाव घेतली तसेच तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना ही माहिती समजताच तेही घटनास्थळी पोहोचले आहेत. विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचाही व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Story img Loader