Aadar Jain-Alekha Advani Wedding : कपूर कुटुंबातला लाडका आदर जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गोव्यात ख्रिश्चिन पद्धतीने लग्न केल्यानंतर आता आदर हिंदू रिती-रिवाजानुसार लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. काही वर्षांपूर्वी आदर अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. पण काही कारणास्तव दोघांचा ब्रेकअप झाला. हे नातं संपुष्टात आल्यानंतर आदर जैन आता अलेखा आडवाणीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच आदर व अलेखाचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्याला कपूर कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त बॉलीवूडचे इतर कलाकार मंडळी आणि राजकीय मंडळी उपस्थित राहिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदर जैन आणि अलेखा आडवाणीच्या मेहंदी सोहळ्याला करीना कपूर बहीण करिश्मा कपूरबरोबर पोहोचली होती. तर रणबीर कपूर पत्नी आलिया भट्ट आणि सासू सोनी राजदानबरोबर पोहोचला होता. सोशल मीडियावर सध्या आदर आणि अलेखाच्या मेहंदी सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील कपूर कुटुंबाच्या जबरदस्त डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये करिश्मा कपूर करीना कपूर आणि आलिया भट्टला डान्स करण्यासाठी उठवताना दिसत आहे. त्यानंतर तिघी कुटुंबाबरोबर डान्स करण्यासाठी सामील होतात. त्यांच्यामागोमाग रणबीर कपूर येऊन जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण कपूर कुटुंब सुखबीरचं प्रसिद्ध गाणं ‘इश्क तेरा तड़पावे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

दरम्यान, आदरने अलेखाला हटके अंदाजात प्रपोज केलं होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचा रोका कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आदर आणि अलेखाचं ख्रिश्चिन पद्धतीने लग्न झालं. यावेळीदेखील मेहंदीपासून ते हळदीपर्यंतचे कार्यक्रम झाले होते. त्यानंतर आता दोघं हिंदू रिती-रिवाजानुसार लग्नगाठ बांधणार आहे.

आदर रीमा जैन यांचा मुलगा आहे. रीमा या शशी कपूरच्या यांच्या बहीण आहेत. त्यामुळे शशी कपूर आदरचे मामा लागतात. म्हणून करीना, करिश्मा, रणबीर कपूर हे आदरचे भाऊ आहेत.