बॉलिवूडची बेबो आणि पतौडी खानदानाची सून करीना कपूर सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. आमिर करीना दोघांना या चित्रपटासाठी ट्रोल करण्यात आले होते. मात्र करीनाने अपयशातून मार्ग काढत आता पुन्हा एकदा आपली कंबर कसली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात ती आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिने लंडन गाठले आहे.

करीनाने यावेळी चित्रीकरणाला जाताना आपल्या धाकट्या मुलाला नेले आहे. नुकतेच तिने दोघांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘माझ्या मुलासोबत काम करायला निघाले…पण निघण्यापूर्वी एक पोज’, असा कॅप्शन तिने दिला आहे. फोटोमध्ये दोघे आहेत, करीनाने पांढरी हुडी परिधान केली आहे तर डेनिम जीन्स, पांढरे शूज आणि गॉगल असा गेटअप केला आहे. मुलानेदेखील काळ्या रंगाचे कपडे परिधान करत आईसारखा गॉगल घातला आहे. त्याने आईचा हात पकडला आहे. आलिया भट्टने या फोटोवर कॉमेंट केली आहे ज्यात ती तिने लिहले आहे सुपरस्टार, त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांचा कॉमेंट्स येत आहेत.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
tiku talsania health update daughter shikha
अभिनेते टिकू तलसानिया यांना आला होता ब्रेनस्टॉक, मुलगी शिखाने दिली प्रकृतीची माहिती; पोस्ट करत म्हणाली…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
veer pahariya varun dhawan body double bhediya
वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता

“माझ्या वडिलांचे गुरु…” प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या मुलाने केला होता खुलासा

हंसल मेहता पहिल्यांदाच करीना कपूरबरोबर काम करणार आहेत. त्यांनी ‘अलिगढ’, ‘छलांग’, ‘ओमेरात’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात करीना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. करीनाचे चाहते या चित्रपटाची वाट बघत आहेत.

करीनाने आपल्या करियरची सुरवात रेफ्युजी चित्रपटातून केली होती. ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘३ इडियट्स’, ‘जब वि मेट’ हे तिचे गाजलेले चित्रपट. करीनाने सैफबरोबर १६ ऑक्टोबर २०१२ साली लग्न केले. करीनाने लग्नानंतरदेखील आपले करियर सुरु ठेवले आहे. करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.

Story img Loader