Kareena Kapoor Khan at Lilavati Hospital : बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूर खानचा पती सैफ अली खान (Saif Ali Khan News Update) लीलावती रुग्णालयात दाखल आहे. करीना व सैफच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरी गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता एक दरोडेखोर घुसला. त्याने आधी मदतनीसशी वाद घातला, त्यानंतर तिथे पोहोचलेल्या सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफला भेटायला करीना रुग्णालयात जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सैफ अली खानच्या घरात रात्री अडीच वाजता ही घटना घडली. त्यानंतर मुलगा इब्राहिमने त्याला साडेतीन वाजता रुग्णालयात नेलं. सैफच्या मणक्याला व हाताला दुखापत झाली. सैफला एकूण सहा जखमा झाल्या, त्यापैकी दोन खोल जखमा होत्या, असं डॉक्टरांनी सांगितलं. सैफवर शस्त्रक्रिया झाली असून त्याला रिकव्हरी रुममध्ये हलवण्यात आलं. सैफच्या घरातील मदतनीसदेखील जखमी झाली असून तिच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
सैफवर उपचार सुरू असलेल्या लीलावती रुग्णालयाबाहेरील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओत करीना सैफला भेटण्यासाठी लीलावतीत जाताना दिसत आहे. करीना पोलिसांबरोबर लीलावती रुग्णालयात आली, असं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
पाहा व्हिडीओ –
करीना कपूरआधी सैफची लेक सारा अली खान व मुलगा इब्राहिम अली खान यांनी त्याची रुग्णालयात भेट घेतली. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंददेखील सैफच्या भेटीला रुग्णालयात गेला होता. शाहरुख खानही सैफच्या भेटीसाठी लीलावतीला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – “त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घरातील मदतनीस हल्लेखोराला ओळखत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण हल्ला होण्याच्या दोन तासांआधीपर्यंत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात कोणीही इमारतीत शिरताना दिसलं नाही. त्यामुळे हल्लेखोर आधीच इमारतीत असावा, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस सैफ अली खानच्या घरातील सर्व स्टाफची चौकशी करत आहेत, जेणेकरून हल्लेखोराबाबत माहिती मिळू शकेल.