बॉलीवूड अभिनेत्यांनी त्यांनी भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीची चर्चा नेहमीच होते, मात्र काही अभिनेत्री असतात ज्या आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडतात. आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकून ट्रेंड सेट करणाऱ्या अनेक अभिनेत्री इंडस्ट्रीत आहेत. इंडस्ट्रीत टिकण्यासाठी हिट चित्रपट देणं अत्यावश्यक आहे. अशीच एक अभिनेत्री जी तिच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायची, तिला करिअरमधील आव्हानात्मक टप्प्याला सामोरं जावं लागलं. फ्लॉप झालेल्या चित्रपटांच्या मालिकेनंतर, तिचा स्टारडम ओसरतोय असं वाटत असताना तिच्या करिअरला एक अनपेक्षित ट्विस्ट मिळाला. कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री आहे बॉलीवूडची क्वीन बेबो, म्हणजेच करीना कपूर खान! करीनाने एकेकाळी सलग दहा चित्रपट फ्लॉप दिले होते. यामुळे बेबो डिप्रेशनमध्ये गेली होती. पण बेबोच्या आयुष्यात एक सिनेमा आला आणि त्यामुळे ती पुन्हा बॉलीवूडची स्टार झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर केला होता.
हेही वाचा…“गौरी चांगली आई होईल अजिबात वाटलं नव्हतं”, शाहरुख खानचे पत्नीबद्दलचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
करीना कपूरने २००० साली ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट फीमेल डेब्यू पुरस्कार मिळाला, या चित्रपटात करीनाने अभिषेक बच्चनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात करीनाने ‘पू’ या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं. परंतु सुरुवातीच्या या यशानंतर तिच्या करिअरमध्ये खडतर काळ आला. अपेक्षेप्रमाणे तिचे पुढील चित्रपट यश मिळवू शकले नाहीत. २००२ मध्ये आलेल्या’ मुझसे दोस्ती करोगे’ पासून करीनाचे सलग १० चित्रपट फ्लॉप ठरले. यामुळे अनेकांना करीनाची बॉलीवूडमधील जादू संपत चालली आहे असं वाटलं.
या कठीण काळाबद्दल बोलताना करीनाने एकदा सांगितलं होतं, “’जब वी मेट’च्या आधी माझे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. मला पुढे काय होईल याची चिंता वाटायला लागली होती, आणि त्यावेळी माझ्याकडे बराच मोकळा वेळ होता.” या कठीण काळानंतर करीनाने तिच्या तेव्हाच्या प्रियकराबरोबर म्हणजेच शाहीद कपूर बरोबर ‘जब वी मेट’ सिनेमा केला आणि तिच्या करिअरची गाडी पुन्हा रुळावर आली. १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने ५० कोटींची कमाई केली. ‘जब वी मेट’ २००८ या वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला. या चित्रपटानंतर करीनाच्या करिअरला नवा जोम मिळाला. पुढे तिने ‘थ्री इडियट्स’ सारखे अनेक हिट सिनेमे दिले.
‘जब वी मेट’ चं शूटिंग संपण्याच्या दोन दिवस आधीच झालं ब्रेकअप
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या प्रेमप्रकरणाचा शेवट ‘जब वी मेट’ च्या शूटिंगदरम्यान झाला असं म्हटलं जातं. या चित्रपटानंतर दोघं पुन्हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि समीक्षकांचंही कौतुक मिळवलं होतं.
हेही वाचा…“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना
‘गॅलेटा इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत, शाहिद-करीनाच्या ब्रेकअपबद्दल बोलताना इम्तियाज अली म्हणाला, “(ते दोघं) चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात वेगळे झाले. चित्रपटाचं बरंच शूटिंग होऊन गेलं होतं. त्यांच्या ब्रेकअपनंतर केवळ दोन दिवसांचं शूट बाकी होतं, पण ते दोघंही अत्यंत व्यावसायिकपणे वागले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही सुरू होतं, त्याचा त्यांच्या कामावर कोणताही परिणाम झाला नाही.”