बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांचे चित्रपट, कधी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट, तर कधी त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडची लाडकी बेबो म्हणजेच करीना कपूर खान( Kareena Kapoor Khan) सध्या तैमूरच्या नॅनी ललिता डिसिल्वा यांच्यामुळे चर्चेत आली आहे.

ललिता डिसिल्वा यांनी नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना असे विचारण्यात आले की, अनेक रिपोर्टमधून समोर आले आहे की, महिन्याला तुमचा पगार २.५ लाख आहे. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मोठ्या चर्चेत आहे. त्या म्हणतात, “तितके पैसे मला मिळाले असते, तर बरे झाले असते. या चर्चा जेव्हा सुरू होत्या त्यावेळी मी करीनाला विचारले होते, की तुम्ही खरंच इतका पगार मला देणार आहात? त्यावर करीनाने मला म्हटले होते की, हा सगळा विनोदाचा भाग आहे, याला गांभीर्याने घेऊ नका.” त्याबरोबरच त्यांनी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचे त्यांच्या मुलांशी म्हणजेच तैमूर आणि जेहबरोबर कसे नाते आहे याचादेखील खुलासा केला आहे. त्या म्हणतात- “तैमूरच्या शाळेत जितक्या स्पर्धा, मीटिंग असतात, त्या सगळ्यांना करीना स्वत: हजर असते. सैफ आणि करीना जसे स्वत:साठी वेळापत्रक बनवतात, त्याचप्रमाणे मुलांसाठीदेखील वेळापत्रक बनवतात. मुलांबरोबर जितका वेळ त्यांना घालवता येईल तितका वेळ घालवतात. शूटिंगदरम्यानच्या ब्रेकमध्ये ते मुलांना भेटतात. करीना खूप शिस्तबद्ध असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ललिता डिसिल्वा यांनी म्हटले आहे की, करीना आणि सैफ कधीही स्टाफला वेगळी वागणूक देत नाहीत. उदाहरणार्थ- ते जे खातात, ज्या दर्जाचे अन्न खातात, तेच अन्न स्टाफसाठीही दिले जाते. अनेकदा आम्ही एकत्र जेवण केले आहे. सैफला स्वत: जेवण बनवायला आवडते. अनेकदा तो स्वत: स्टाफसाठी जेवण बनवतो, अशी आठवण ललिता डिसिल्वा यांनी सांगितली आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

हेही वाचा: BB Marathi : पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी! वर्षा उसगांवकरांच्या मेकअपमुळे निक्कीसह घरातील सदस्य संतापले, पाहा व्हिडीओ

दरम्यान, करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आमचा स्टाफ आणि आम्ही एकत्रच जेवण करतो. स्टाफला दुसरीकडे बसून वेगळे जेवण करताना पाहून प्रश्न विचारावेत, असे आम्हाला वाटत नाही. ललिता डिसिल्वा या पीडियाट्रिशियन आहेत. तैमूरच्या जन्मानंतर त्या त्याच्या नॅनी म्हणून काम करीत आहेत. करीना-सैफचा लहान मुलगा जेह याचीदेखील त्या काळजी घेताना दिसतात. याआधी त्यांनी अनंत अंबानींची नॅनी म्हणून काम केले आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात त्यांनी हजेरी लावल्यानंतर त्या खूपच चर्चेत आल्या आहेत.

Story img Loader