बॉलीवूडमधील कलाकारांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चा होते. आता अभिनेत्री करीना कपूरने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या मुलांमुळे तिच्यामध्ये कोणते बदल झाले, याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री करीना कपूरने ‘हार्पर बझार’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत मुलांच्या जन्मानंतर तिचे आयुष्य सकारात्मकदृष्ट्या कसे बदलले याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
करीना कपूर म्हणाली, “माझ्या आयुष्यात मुलांसह आता क्रिकेट आणि फुटबॉल केंद्रस्थानी आहेत. मला कलाकारांपेक्षा हॅरी केन सारख्या फुटबॉलपटूंबद्दल अधिक माहिती आहे. मुलांची आई असल्यामुळे माझ्या आवडी-निवडीवर त्याचा परिणाम होत आहे. मी त्यांची आवड स्वीकारली असून, त्यांच्या जगाचा भाग बनणे आनंददायी आहे.”
करीनाचा पती व अभिनेता सैफ अली खान याच्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “तो खूप विनोदी आहे. आम्हा दोघांनाही आमचे काम खूप आवडते; पण एकमेकांबरोबर मजा करायलादेखील तितकेच आवडते. आम्हा दोघांना फिरणे आवडते. मला वाटते की, मी त्याच्या जीवनात आनंद आणला आहे. साहसी कामाप्रति आम्हाला प्रेम वाटते.”
एका जुन्या मुलाखतीत करीनाने म्हटले म्हटले होते, “आमची पालकत्वाची शैली खुली आहे. आम्ही तैमूरला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढवतो, त्याचा आदर करतो. त्याला हे शिकवण्याचा प्रयत्न करतो की, जर तू चुका केल्यास, तर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. तू घेतलेल्या निर्णयांना तुलाच सामोरे जावे लागेल आणि तो मुलगा असल्यामुळे परिणामांची मला पूर्णत: स्पष्टता आहे.”
पुढे ती म्हणाली, “माझे आणि सैफचे असे ठरले आहे की, ज्यावेळी तो एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करीत असेल त्यावेळी मी कोणत्या चित्रपटात काम करणार नाही. तसेच जेव्हा मी शूटिंग करीत असेन तेव्हा तो करणार नाही.”
करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानबरोबर लग्न केले. २०१६ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव तैमूर असे आहे. २०२१ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला, त्याचे जेह असे नाव आहे. करीना आणि सैफ यांच्याबरोबरच तैमूर आणि जेहचादेखील चाहता वर्ग मोठा आहे.