सोशल मीडिया असे माध्यम आहे, ज्या ठिकाणी सर्व स्तरातील लोक आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. त्यामध्ये बॉलीवूडच्या कलाकारांचादेखील समावेश आहे. आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांमध्ये करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे जोडपे अग्रस्थानी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने सैफ अली खानबरोबर लग्न झाल्यानंतर ती माणूस म्हणून कशी बदलली, याबद्दल वक्तव्य केले आहे. याबरोबरच त्यांच्यात कोणत्या गोष्टींमुळे भांडणे होतात, याचा खुलासादेखील केला आहे.

करीना कपूर खानने नुकतीच ‘द वीक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्या लग्नाबद्दल, सैफ अली खानबरोबरच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणते, “सैफ बरोबरच्या लग्नाने मला चांगल्यासाठी बदलले आहे. मी जास्त जबाबदार व्यक्ती झाले आहे. आम्ही एकमेकांचे पाय जमिनीवर ठेवण्यास एकमेकांना मदत करतो. मी कधी जास्त विचित्र वागत असेल तर तो मला सांगतो आणि मीदेखील त्याला सांगते. माणूस म्हणून माझ्यात चांगले बदल झाले असल्याचे करीनाने म्हटले आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा: “त्यानंतर प्रियांकाच्या खूप तक्रारी आल्या”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला देसी गर्लबरोबर काम करण्याचा अनुभव

दोन कलाकारांनी लग्न केल्यावर नात्यामध्ये काय अडचणी येतात यावर उत्तर देताना तिने म्हटले की, नवरा बायको दोघेही अभिनय क्षेत्रात असतील, कलाकार असतील तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, तो शूटिंगवरून सकाळी ४.३० ला घरी परतला आणि झोपला, त्यावेळी मी शूटिंगसाठी बाहेर पडले. आता जेव्हा तो उठेल आणि शूटिंगसाठी जात असेल तेव्हा मी बँकॉककडे जाण्यासाठी विमानप्रवास करत असेन. आम्ही एका घरात राहूनदेखील एकमेकांना बघू शकत नाही. वेळेचा समतोल राखणे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आम्ही कॅलेंडर घेऊन बसतो आणि एकमेकांसाठीचा वेळ देण्यासाठी दिवस ठरवतो आणि ज्या घरात दोन कलाकार आहेत, तेथे हेच घडते असे करिनाने म्हटले आहे.

याच मुलाखतीतकरीना कपूर खानने तिचे सैफबरोबर कोणत्या कारणामुळे भांडण होते याचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, आमच्यात एसीच्या टेंपरेचरवरून भांडणे होतात. त्याला जास्त उकडत असल्याने त्याला एसीचे टेंपरेचर १६ हवे असते आणि मला थंडी वाजत असल्याने मी २० वर करण्याचा आग्रह धरते. मग तो आपण १९ टेंपरेचरवर सेटल करूयात असे म्हणतो. मात्र, जेव्हा करिश्मा जेवायला घरी येते, त्यावेळी ती हळूहळू एसीचे टेंपरेचर २५ वर करते. त्यावेळी सैफ कायम म्हणतो, बरे झाले मी बेबोबरोबर लग्न केले, कमीत कमी ती एसीचे टेंपरेचर १९ करण्यासाठी राजी असते. पुढे बोलताना तिने म्हटले आहे की, आमच्यात भांडण होण्याचे महत्त्वाचे कारण ‘वेळ’ हे आहे. कारण आम्ही अनेक दिवस एकमेकांना बघू शकत नाही. आम्ही कधीच पैसे किंवा इतर गोष्टींवरून भांडत नाही, पण एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आमच्यात भांडणे होतात.दरम्यान, सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

Story img Loader