Kareena kapoor khan postponed her work :बॉलीवूडची बेबो, करीना कपूर खानचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात करीना गुप्तहेराच्या भूमिकेत आहे आणि तिने एकता कपूरबरोबर या सिनेमाची निर्मितीसुद्धा केली आहे. करीना बऱ्याचदा तिच्या कुटुंबाबरोबर आणि मैत्रिणींबरोबर फिरायला जाताना, पार्टी करताना दिसते. तिच्या जवळच्या मैत्रिणींपैकी मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघी बहिणी आहेत. नुकतंच मलायका आणि अमृता यांच्या सावत्र वडिलांचं निधन झालं. मैत्रिणीसाठी करीनाने तिची आगामी कामं पुढे ढकलली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

११ सप्टेंबर रोजी अरोरा बहिणींच्या सावत्र वडिलांनी मुंबईतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अनिल मेहता यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मलायकाच्या आईच्या घरी पोहोचले. यामध्ये अभिनेत्री करीना देखील होती. करीना आणि मलायका-अमृता या बहिणी गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांना एकत्र फिरताना, सुट्ट्या घालवताना, आणि एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावताना अनेकदा दिसतात. आता या दुःखाच्या प्रसंगी करीना त्यांच्या जवळ राहून त्यांचं सांत्वन करत आहे.

हेही वाचा…Video: मलायका अरोराचे सावत्र वडील अनंतात विलीन; अरबाज खानने दुसऱ्या पत्नीसह मलायकाच्या कुटुंबियांची घेतली भेट

‘न्यूज १८’ च्या वृत्तानुसार, या कठीण काळात आपल्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी करीनाने तिची काही कामं पुढे ढकलली आहेत. ती गुरुवारी मुंबईत एका लाँच इव्हेंटमध्ये सहभागी होणार होती. पण करीनाच्या टीमने या घटनेमुळे कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सावत्र वडिलांच्या निधनावर मलायकाची सोशल मीडिया पोस्ट

बुधवारी, मलायकाने तिच्या सावत्र वडिलांच्या अकाली निधनाबद्दल इन्स्टाग्रामवर अधिकृत निवेदन जारी केलं होतं. तिने लिहिलं, “आमचे प्रिय बाबा, अनिल मेहता यांचं निधन झाल्याचं कळवताना खूप दु:ख होतं आहे. ते खूप चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सगळ्यात जवळचे मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना गोपनीयतेची विनंती करतो.” या पोस्टमध्ये मलायकाने तिच्या आई जॉयसी, बहीण अमृता आणि कुटुंबातील इतर सदस्यांची नावं लिहिली होती.

हेही वाचा…मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? शवविच्छेदन अहवालातून माहिती आली समोर

अनिल मेहता यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी मलायकाच्या आईच्या घरी हजेरी लावली. अरबाज खान, सोहेल खान, सलीम खान आणि सलमा खान यांनी मलायकाच्या आईची भेट घेतली. काल सलमान खाननेही मलायकाच्या आईची भेट घेतली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor postpones work to support malaika and amrita arora after stepfather death psg