अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरप्रमाणेच त्यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान नेहमीच चर्चेत असतो. तैमूर लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तैमूरचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचा एक फोटो घेण्यासाठी पापसाझींमध्ये चढाओढ होताना दिसते. चाहत्यांकडूनही तैमूरच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते.
तैमूरबाबात छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यास चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. मोठा झाल्यावर तैमूर आई-बाबासारखाच अभिनय क्षेत्रात येणार का अनेकदा असा प्रश्न विचारला जातो. दरम्यान एका मुलाखतीत सैफ अली खान व करीनाने याबाबतचा खुलासा केला आहे. सैफ म्हणाला, तैमूला अभिनेता बनण्यात कोणताही रस नाही. त्याला फूटबॉल खेळाडू बनायचे आहे. त्यासाठी त्याला अर्जेंटीनाला जायचे आहे. तर करीना म्हणाली, त्याला गिटारिस्टही बनण्याची इच्छा आहे. तसेच त्याला मेस्सीसारखा प्रसिद्ध फूटबॉलपटूही बनायचे आहे.
सैफ व करीनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, सैफ २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार प्रभास व क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने म्हणावी तशी कामगिरी केली नव्हती. आता लवकरच सैफचा ‘देवारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर, प्रकाश राज व जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका आहे.
करिनाबद्दल बोलायचे झाले तर ती हंसल मेहताच्या ”द बकिंगहॅम मर्डर्स’मध्ये दिसणार आहे. तसेच तिचा ‘द क्रू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर तब्बू व क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका आहे. तसेच ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.