कपूर घराण्याचा वारसा पुढे नेणारी अन् सध्याच्या काळातील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. इंडस्ट्रीमधील गॉसिप गर्ल अशी ओळख असणारी करीनाने नुकतंच ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. याआधी आमिर खानबरोबरचच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना झळकली, चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटाला झालेल्या विरोधाबद्दल अन् त्यानंतर झालेल्या बदलांविषयी करीनाने भाष्य केलं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. हा चित्रपट फ्लॉप ठरण्यामागे बरीच कारणं होती. त्यानंतर जेव्हा करीना आणि आमिर आमने-सामने आले तेव्हा आमिरच्या नजरेत एक वेगळीच गोष्ट करीनाला जाणवली.

आणखी वाचा : तेलुगू चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार खलनायक; दग्गुबती व्यंकटेशच्या ‘सैंधव’चा दमदार टीझर प्रदर्शित

नुकतंच ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये करीनाने याबद्दल भाष्य केलं आहे. करीना म्हणाली, “नुकतंच NMACC च्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान मी आणि आमिर चित्रपट केल्यानंतर प्रथमच भेटलो. त्यावेळी आमिरच्या डोळ्यातील निराशा आणि क्षमस्व भाव स्पष्टपणे जाणवत होता. आम्ही ‘३ इडियट्स’ आणि ‘तलाश’सारखे सुपरहीट चित्रपट एकत्र दिले आहेत. त्यानंतर मी आमिर आणि आणि आमचा दिग्दर्शक अद्वैत चंदन यांना व्हॉट्सअपवर एक भलं मोठं पत्र पाठवलं अन् त्यात लिहिलं की आपलं नातं, मैत्री हे चित्रपटाच्या यश किंवा अपयशावर कधीच अबलंबून नव्हतं अन् नसेल.”

आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक होता. या चित्रपटात आमिर खान व करीना कपूर दोघेही प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खानने अभिनयातून ब्रेक घ्यायचं नक्की केलं. आता तो ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटातून कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor says aamir khan was very apologetic when they meet first time after laal singh chaddha avn