अभिनेत्री करीना कपूरच्या अभिनयाचे खूप चाहते आहेत. ती खूप उत्तम अभिनय करते. आतापर्यंत करीनाने कधीच अभिनयातून निवृत्त होण्याबाबत भाष्य केलं नाही. तिने नुकतीच ‘इंडिया एक्सप्रेस’च्या अड्डामध्ये हजेरी लावली. यावेळी तिने निवृत्तीबद्दल वक्तव्य केलं.
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”
करीना म्हणाली की तिने १९ वर्षी रिफ्युजी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून तिच्यात खूप बदल झाले. ती बऱ्याच गोष्टी शिकली. तेव्हापासून आतापर्यंत जर तिच्यात एखादी गोष्ट कायम राहिली असेल तर तो आहे तिचा अभिनय करण्याचा उत्साह. आपण तो उत्साह गमावू इच्छित नाही, असं करीनाने नमूद केलं.
“जर मी तो उत्साह गमावला, तर मला असं वाटतं की मी थांबायला हवं. कारण सेटवर येण्याची इच्छा, कॅमेर्याला सामोरे जाण्याच्या इच्छेचा उत्साह तो अजूनही ४३ व्या वर्षी कायम आहे. पण मला माहीत आहे की कायम हा उत्साह नसेल आणि एक दिवस असा येईल जेव्हा मी काम करणार नाही,” असं करीना म्हणाली.
“मी जे काही करते त्याबद्दल मी खूप, खूप उत्साही असते, ते मला करायला आवडलं. मी जे खाते ते मला खूप आवडते. जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत बाहेर असते किंवा मी प्रवास करते तेव्हा मी प्रचंड उत्साही असते. ती व्यक्ती मी आहे. म्हणून जर एखादा दिवस असा आला आणि मला कळालं की मी तो उत्साह गमावत आहे, तर मी समजेन की निवृत्तीची वेळ आली आहे. पण आपल्याला काम करत राहायची इच्छा आहे,” असं करीना कपूर खान म्हणाली.