Kareena Kapoor Shahid Kapoor Video: यंदाचा आयफा अवॉर्ड्स सोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी राजस्थानला पोहोचत आहेत. तेथील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत. यापैकी एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा चर्चेत असलेला व्हिडीओ करीना कपूर व शाहिद कपूर यांचा आहे. १८ वर्षांपूर्वी शाहिद व करीनाचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर एकमेकांबरोबर काम करणं तर सोडा बघणंही टाळणारे शाहीद व करीना चक्क एकमेकांची गळाभेट घेताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून ‘जब वी मेट’च्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आयफा अवॉर्ड्समध्ये शाहिद कपूर व करीना कपूरची भेट झाली. तिथे करण जोहर व कार्तिक आर्यनदेखील होते. शाहिद व करीना एकमेकांसमोर आले, तिथे त्यांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर ते बराच वेळ एकमेकांशी बोलताना दिसले.
पाहा व्हिडीओ-
हेही वाचा – फ्लॉप करिअर, २० वर्षांपूर्वी केलेलं आंतरधर्मीय लग्न अन्…; अभिनेत्री मुमताजचा जावई आहे ‘हा’ बॉलीवूड अभिनेता
शाहिद व करीनाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना फार आनंद झाला आहे. ते या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. ‘गीत व आदित्यचं अखेर रियुनियन झालं,’ ‘या दोघांना एकत्र पाहून खूप बरं वाटतंय,’ ‘या दोघांना पाहून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले,’ ‘ते दोघे बोलतायत आणि मला आनंद होतोय,’ अशा कमेंट्स करीना व शाहिदच्या या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

‘जब वी मेट’च्या शूटिंगदरम्यान झालेलं करीना-शाहिदचं ब्रेकअप
१७ वर्षांपूर्वी इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना व शाहिदचे ब्रेकअप झाले. या चित्रपटानंतर दोघं पुन्हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात दिसले. मात्र त्यांचे सीन एकमेकांबरोबर नव्हते. बरेचदा शाहिद व करीना एकाच इव्हेंटला हजेरी लावायचे, पण ते एकमेकांशी बोलणं, एकमेकांकडे बघणंही टाळायचे. आता बऱ्याच वर्षांनी या दोघांना एकत्र फोटो पाहून चाहते खुश झाले आहेत.