अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. तैमुर नेहमीच लाइमलाइटमध्ये असतो. अनेकदा त्याचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच तैमुरने ६ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये करीना कपूरने तिच्या मुलाचा भविष्यातला प्लान सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीना कपूरने तैमुरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोंमधील पहिल्या फोटोमध्ये तैमुर आभाळ आणि समुद्र पाहताना दिसत आहे. तर बाकीच्या फोटोंमध्ये तो बेडवर मस्ती करताना दिसत आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा-तैमूरला खांद्यावर घेत सैफने करीनाला केलं किस; व्हिडीओ व्हायरल

करीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “टिम, तुला जमिनीचं अखेरच टोक दिसतंय का? मी तुझ्यावर तेवढं प्रेम करते. माझ्या बाळा, स्वप्न पाहत राहा. सूर्यास्ताचा पाठलाग करत राहा, शोध घेत राहा आणि नक्कीच आमच्या बेडवर अशाच उड्या मारत राहा. तुझं म्यूझिक तयार कर आणि गिटार वाजवत राहा. तुला माहीतच आहे की जेव्हा तू स्वतःचा बॅन्ड तयार करशील तेव्हा सर्वात जास्त प्रोत्साहन कोण देणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा टिम.” करीनाची ही पोस्ट वाचल्यानंतर समजतं की तैमुरला संगीत क्षेत्रात जास्त रुची आहे. त्यामुळे तो भविष्यात याच क्षेत्रात करिअर करेल असं बोललं जातंय.

आणखी वाचा-आता मी येतच नाय! लेक तैमूरच्या पाठीमागे धावणाऱ्या करीना कपूरचा व्हिडीओ व्हायरल

करीना कपूरच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट्समध्ये सोनम कपूर, करिश्मा कपूर, सबा अली खान, दिया मिर्झा यांनी तैमुरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनीही करीनाच्या पोस्टवर कमेंट करत तैमुरचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor share taimurs future plan on his 6 th birthday mrj