कपूर घराण्याचा वारसा पुढे नेणारी अन् सध्याच्या काळातील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. इंडस्ट्रीमधील गॉसिप गर्ल अशी ओळख असणारी करीना ही आता लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. याआधी आमिर खानबरोबरचच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना झळकली, चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

करीनाने नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटक्षेत्रातील तिचा आजवरचा प्रवास अन् तिला आलेले अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये करीनाने हिंदी कमर्शियल हिंदी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट
Richa Chadha
मुलाला योग्यप्रकारे वाढविण्याची जबाबदारी स्त्रियांची का असते? रिचा चड्ढा गिझेल पेलिकॉटचे उदाहरण देत म्हणाली…
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल

आणखी वाचा : तैमुर नाव का ठेवलं? करीना कपूरने प्रथमच मांडली स्वतःची बाजू; ट्रोलर्सला स्पष्ट उत्तर देत म्हणाली…

याबरोबरच करीनाने तिच्या आणि सैफ अली खानच्या वयातील अंतरावरही भाष्य केलं आहे.जेव्हा करीनाने सैफशी लग्न केलं त्यावेळीही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आपल्याहून १० वर्षांनी मोठा असणाऱ्या सैफबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर करीनाला खूप लोकांनी वेगवेगळे सल्लेही दिले. आता इतक्या वर्षांनी यासगळ्याकडे नेमकं ती कसं पाहते याबाबत तिने स्पष्टीकरण दिलं आहे.

करीना म्हणाली, “मला असं वाटतं की वय ही गोष्ट खरंच इतकी महत्त्वाची नसते. तुम्ही आज सैफकडे पहाल तर तो त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षी जेवढा हॉट दिसायचा त्याहून जास्त हॉट तो आत्ता दिसतोय. त्याच्या फिटनेसकडे बघून कोणाचाही विश्वास बसणार नाही की तो ५३ वर्षांचा आहे. आत्तासुद्धा तो चाळीशीत आहे असंच वाटतंय अन् तो दिवसेंदिवस आणखीन हॉट होत आहे. त्यामुळे वय ही गोष्ट कधीच इतकी महत्त्वाची नसते, त्याचा एवढा विचार आपण का करायचा. उलट मला आनंद आहे मी त्याच्यापेक्षा १० वर्षं लहान आहे, खरं टेंशन त्याला यायला हवं. आमचे विचार खूप मिळते जुळते आहेत आणि एखाद्या नात्यात हीच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते.”

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात करीनाबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीनाच्या वाढदिवशी म्हणजेच २१ सप्टेंबरला ‘जाने जान’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader