कपूर घराण्याचा वारसा पुढे नेणारी अन् सध्याच्या काळातील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. इंडस्ट्रीमधील गॉसिप गर्ल अशी ओळख असणारी करीना ही आता लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. याआधी आमिर खानबरोबरचच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना झळकली, चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीनाने नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटक्षेत्रातील तिचा आजवरचा प्रवास अन् तिला आलेले अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये करीनाने हिंदी कमर्शियल हिंदी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल भाष्य केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दल करीनाने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ३०० क्रू मेंबर्सना ‘ही’ खास भेटवस्तू; कलानिधी मारन यांनी साजरं केलं रजनीकांत यांच्या ‘जेलर’चं यश

करीना म्हणाली, “आपल्या सगळ्यांचा लाडका किंग खान हा पडद्यावर येणार यासाठी शाहरुखचे चाहते म्हणून आपण सगळेच फार उत्सुक आहोत. प्रेक्षकांना पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येने चित्रपटगृहात खेचून आणायचं काम फक्त शाहरुखच करू शकतो. मी अद्याप ‘जवान’ पाहिलेला नाही, पण मी आणि सैफ आम्ही दोघेही तो चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहोत.”

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात करीनाबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीनाच्या वाढदिवशी म्हणजेच २१ सप्टेंबरला ‘जाने जान’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor speaks about shahrukh khan starrer jawan at express adda avn