रणबीर कपूर, करीना कपूर व करिश्मा कपूर यांच्या आत्याचा मुलगा अभिनेता आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. गोव्यात आदर व अलेखा यांनी लग्न केलं. या सोहळ्याला नीतू कपूर यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. अलेखा व आदर यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आदर जैन व अलेखा अडवाणी यांचा लग्नसोहळा १२ जानेवारी २०२५ रोजी गोव्यात पार पडला. आदरने लग्नासाठी ग्रे कलरचा सूट निवडला होता ज्यामध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. तर अलेखा अडवाणी पांढऱ्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अलेखाने मॅचिंग नेकलेस आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला होता.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…

हेही वाचा – “मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

आदरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये काही स्टोरी रिपोस्ट केल्या आहेत. त्यात अनेक फोटो व व्हिडीओंचा समावेश आहे. या फोटोंमध्ये हे जोडपे भरपूर रोमान्स करताना दिसत आहे. या जोडप्याच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाच्या खास क्षणांची झलक त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यातील एका व्हिडीओमध्ये आदर व अलेखा लिप लॉक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ –

आदर जैन हा अभिनेत्री तारा सुतारियाबरोबर २०२० ते २०२३ या काळात रिलेशनशिपमध्ये. दोघेही तीन वर्षे एकत्र होते, तारा आदरबरोबर कपूर कुटुंबाच्या प्रत्येक सेलिब्रेशनला असायची. आदरची होणारी पत्नी अलेखा ही तारा व आदर दोघांचीही चांगली मैत्रीण होती. काही काळाने तारा व आदरचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आदर व अलेखा बॉलीवूड पार्ट्यांमध्ये व इव्हेंट्समध्ये एकत्र दिसू लागले. मग दोघांनी सोशल मीडियावर नातं अधिकृत केलं. त्यानंतर आदरने अलेखाला लग्नासाठी प्रपोज केलं. या प्रपोजलनंतर मुंबईत दोघांची रोका सेरेमनी पार पडली. या रोका सेरेमनीला करीना कपूर, करीश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्टसह कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा – सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

अलेखा अडवाणी हिचं शिक्षण न्यूयॉर्कमध्ये झालं असून ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय आहे. तारा आणि अलेखा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दरम्यान, आदर जैन हा अभिनेते-चित्रपट निर्माते राज कपूर यांची मुलगी रीमा जैनचा मुलगा आहे. रीमा जैन ही करिश्मा, करीना आणि रणबीर कपूर यांची आत्या आहे. आदरने ‘कैदी बँड’, ‘मोगुल’ आणि ‘हॅलो चार्ली’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader