बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिका, तर कधी त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री करिश्मा कपूरने एका कार्यक्रमात कपूर घराण्यातील स्त्रियांना काम करण्याची बंदी होती का? यावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली अभिनेत्री?

करिश्मा कपूरने नुकतीच झाकिर खानच्या ‘आपका अपना झाकिर’ या शोमध्ये हजेरी लावली होती. कपूर घराण्यातील स्त्रियांना काम वा अभिनय करण्याची परवानगी नव्हती. अशा अनेक चर्चा होत असतात; हे खरे आहे का? यावर बोलताना करिश्मा कपूरने म्हटले, “मला काम करण्याची परवानगी होती किंवा नव्हती या सगळ्या अफवा आहेत. जेव्हा माझ्या आईचे लग्न झाले आणि नीतू आंटीचे लग्न झाले तेव्हा संसार करण्याची त्यांची निवड होती. त्यांना घर सांभाळायचे होते, मुले हवी होती आणि त्यांचे करिअर चांगले झाले होते. ही त्यांची निवड होती.”

पुढे बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “शम्मी अंकल आणि शशी अंकल यांच्या पत्नी गीता बालीजी आणि जेनिफर आंटी यांनी लग्न झाल्यावरदेखील काम केले. त्यामुळे कपूर घराण्यात लग्न झाल्यावर स्त्रिया काम करू शकत नाहीत किंवा कपूर कुटुंबातील मुलींना काम करण्याची परवानगी नाही, असे काही नव्हते.

जेनिफर केंडल यांचे शशी कपूर यांच्याशी लग्न झाले होते. त्या ‘पृथ्वी थिएटर’च्या संस्थापिका होत्या. त्याबरोबरच १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ३६ चौरंगी लेन’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना ‘बाफ्टा’ पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे टॉकी’ , १९७८ साली प्रदर्शित झालेला ‘जुनून’, १९८३ साली प्रदर्शित झालेला ‘हिट अ‍ॅण्ड डस्ट’ या चित्रपटांत त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. १९८४ साली त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले.

हेही वाचा: Video: गोव्याला जाऊन काय करता? बिग बॉसने पंढरीनाथ कांबळेंची शर्टवरून घेतली फिरकी

शम्मी कपूर यांच्याबरोबर लग्न झालेल्या गीता बाली यांनी ७५ पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले होते. १९५० मध्ये ‘बावरे नैन’, १९५१ मध्ये ‘अलबेला’, ‘बाझी’, १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाल’ अशा अनेक चित्रपटांतील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांनी काम केले होते. १९५० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती.

दरम्यान, करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोघींनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karishma kapoor open ups rumors about kapoor family womens not allowed to work nsp