कोणत्याही कलाकाराच्या नशिबात ती ती भूमिका लिहलेली असते. जसे ‘शोले’ चित्रपटात गब्बर या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोप्पा यांना विचारण्यात आले होते मात्र अखेर ती भूमिका अजमद खान यांनी केली. आजही गब्बर सिंग हे पात्र लोकांच्या लक्षात आहे. असाच एक चित्रपट म्हणजे ‘दिल तो पागल हैं’, नुकतीच या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली आहे. यश चोप्रा यांनी त्याकाळातील स्टार्स लोकांना घेऊन हा चित्रपट बनवला होता.
यश चोप्रा आणि प्रेमकथा हे समीकरण होतेच, त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतुन प्रेमाचे पैलू दाखवले आहेत. या चित्रपटातदेखील प्रेमाचा त्रिकोण दाखवला गेला आहे. शाहरुख खान, करिष्मा कपूर, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार हे नव्वदच्या दशकातील स्टार्स पहिल्यांदा या चित्रपटात काम करत होते. करिष्माने साकारलेल्या निशा या भूमिकेसाठी आधी बऱ्याच अभिनेत्रींनी विचारण्यात आले होते. जस की जुही चावला, उर्मिला मातोंडकर, काजोल, मनीषा कोईराला अशा दिग्गज अभिनेत्रींना विचारले होते मात्र प्रत्येकीने नकार दिला आणि अखेर करिष्मा कपूरने होकार दिला आणि तिची ही भूमिका विशेष गाजली.
Video : “वडिलांच्या पैशांंवर….”; हॅलोवीन पार्टीमुळे आर्यन खान पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या रडारावर
या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील गाणी चांगलीच गाजली. संगीत नृत्य, प्रेम, मैत्री अशा गोष्टींनी या चित्रपटाची कथा लिहण्यात आली होती. १९९७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव आधी ‘मैने मोहब्बत कर ली’ असे ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतरदेखील बदल करण्यात आले मात्र अखेरीस ‘दिल तो पागल है’ ठेवण्यात आले.
या चित्रपटाची जमेची बाजू होती ती म्हणजे संगीत, या चित्रपटातला उत्तम सिंग यांनी संगीत दिले होते. या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल १०० ट्यून्स बनवल्या होत्या. यश चोप्रा यांनी त्यातील ९ ट्यून्स निवडल्या. उत्तम सिंग यांनी या चित्रपटावर दोन वर्ष काम केले होते.