हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी बहिणींच्या जोडीमध्ये करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गेल्या तीन दशकांमध्ये त्यांनी विविध चित्रपटांद्वारे सिनेसृष्टीत आपले स्थान कायम राखले आहे. करिश्मा आणि करीना नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये नुकत्याच सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये त्यांनी कपूर कुटुंबाचा वारसा, त्यांच्यातील बंध आणि सैफ अली खान यांच्याबद्दल चर्चा केली. सैफनं करिश्मा आणि करीना या दोन्ही बहिणींबरोबर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफबद्दल करीनाचा खुलासा

करीना कपूरने सैफबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल पहिल्यांदा कधी खुलासा केला याबद्दल बोलताना करिश्मा कपूरने सांगितले की, आम्ही दोघी तेव्हा लंडनमध्ये होतो. करिश्मा म्हणाली, “करीनाने मला आधी बसायला सांगितले, तेव्हा मला कळले नाही की, तिने मला का बसायला सांगितले. पण मी एका दुकानात एका सोफ्यावर बसले. आणि करीना म्हणाली, ‘गोष्ट अशी आहे की, मी सैफवर प्रेम करते. आम्ही एकमेकांना डेट करीत आहोत.’ हे ऐकून मला सोफ्याला अजून घट्ट धरून ठेवावेसे वाटले,” असे करिश्मा हसत म्हणाली.

हेही वाचा…४ तास विमानतळावर अडकली अभिनेत्री; संताप व्यक्त करत शेअर केली पोस्ट; म्हणाली, “मोठा गोंधळ…”

करिश्माने पुढे सांगितले की, तिला हे समजून घ्यायला थोडा वेळ लागला. “सैफ तर माझा मित्र आणि सहकलाकार होता नाही का?” करिश्माने करीनाला विचारले; ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. त्यानंतर कपिलने करीनाला विचारले की, सैफने आधी प्रेमाची कबुली दिली का, की करीनाने आधी आपल्या भावना व्यक्त केल्या. करीना हसून म्हणाली, “जे मला ओळखतात. त्यांना माहीत आहे की कदाचित मीच आधी कबुली दिली असेल. मी त्याला थेट माझ्या भावना सांगाव्यात, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.” करीनाने तिच्या स्वभावाचा दाखला देत, “सर्वांना माहीत आहे की, मी स्वतःची आवडती आहे. त्यामुळे कोणाला सांगण्याआधी मला त्यालाच सांगणं गरजेचं होतं,” असे विनोदी शैलीत सांगितले.

हेही वाचा…“माझ्या वडिलांनी मिस इंडियासाठी बिकिनी खरेदीसाठी माझ्याबरोबर येण्याचा धरला होता आग्रह”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला किस्सा…

करिश्मा कपूर नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘मर्डर मुबारक’ या शोमध्ये दिसली होती. तसेच ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे करीना कपूरने ‘द बकिंगघम मर्डर्स’मध्ये अप्रतिम अभिनय केला होता. ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ व अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karisma kapoor opens up about kareena kapoor and saif ali khan relationship on kapil sharma show psg