९० च्या दशकातील हिंदी चित्रपटांमध्ये हिरो हिरोईनला वाचवताना दिसायचे. संकटात असलेल्या हिरोईनचा जीव वाचवणारे अनेक चित्रपट तुम्हीही पाहिले असतील. ३३ वर्षांपूर्वी आलेल्या करिश्मा कपूरच्या पदार्पणाचा चित्रपट ‘प्रेम कैदी’मध्येही असाच एक सीन होता. यात मुख्य अभिनेता हरीश तिला बुडण्यापासून वाचवतो असं दाखवण्यात आलं आहे. पण यामागची खरी कहाणी पडद्यावर दिसतं त्याच्या उलट आहे. अभिनेता हरीशने आता खुलासा केला आहे की चित्रपटात तो करिश्माला वाचवताना दिसतो, पण खऱ्या आयुष्यात मात्र तिनेच त्याला वाचवलं होतं.
‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना हरीश म्हणाला, “चित्रपटात असं दिसतं की करिश्मा तलावात उडी मारते आणि मी तिला वाचवतो, पण प्रत्यक्षात तिनेच मला वाचवलं होतं. या सीनमध्ये करिश्माला वाचवण्यासाठी मी पाण्यात उडी मारली, पण नंतर मीच बुडू लागलो. मला पोहता येत नव्हतं त्यामुळे मी बुडू लागलो. लोकांना वाटलं की मी मस्करी करतोय, पण करिश्माला समजलं की मी बुडतोय आणि तिने मला वाचवलं. मी अक्षरशः तिचे कपडे पकडले होते.”
कोण आहेत रवीना टंडनचे पती? अनिल थडानी नेमका काय व्यवसाय करतात? जाणून घ्या
‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून करिश्माने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. के. मुरली मोहन राव दिग्दर्शित या चित्रपटात दलीप ताहिल, परेश रावल, असरानी, शफी इनामदार आणि भारत भूषण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा १९९० मध्ये आलेल्या ‘प्रेम कैदी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.
‘सैराट’ ला आठ वर्षे पूर्ण! अवघ्या चार कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने जगभरात कमावले होते तब्बल…
करिश्मा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटामध्ये दिसली होती. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात विजय वर्मा, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, संजय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.