बॉलिवूड सेलिब्रिटीज चित्रपट आणि जाहिरातींबरोबरच बऱ्याच खासगी सोहळ्यातही हजेरी लावतात, खासकरून काही मोठ्या लोकांच्या लग्नसोहळ्यात आपल्याला बऱ्याचदा हे सेलिब्रिटीज दिसतात. अशाच एका भोपाळमधील लग्नसोहळ्यात बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि कार्तिक आर्यन यांनी हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लग्नातील दोघांचा एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. या दोघांना एकत्र पाहून कित्येकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. व्हिडिओमध्ये आमिर खानने काळी शेरवानी परिधान केली होती आणि नेहमीप्रमाणेच त्याने त्याच्या ग्रे लूकमध्ये हजेरी लावली. कार्तिक आर्यननेसुद्धा काळ्या रंगाचा कोट, कुर्ता आणि पॅन्ट परिधान केली होती.

आणखी वाचा : Pathaan Box Office Collection : ‘पठाण’ची लवकरच होणार ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; सोमवारीही चित्रपटाची जबरदस्त कमाई

या व्हिडिओमध्ये दोघांनी प्रियांका चोप्राच्या ‘तूने मारी एन्ट्रीयां’ या गाण्यावर डान्सही केला. प्रथम कार्तिक आणि मग आमिरने डान्स फ्लोरवर थीरकत कार्यक्रमात जान आणली. या दोघांना या गाण्यावर थिरकताना पाहून बऱ्याच लोकांनी यांना एकत्र एका चित्रपटात काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ चित्रपटातून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. कार्तिक आर्यन मात्र ‘भूलभुलैया २’नंतर यशाच्या शिखरावर विराजमान आहे. त्याच्या आता ‘शहजादा’ या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. कार्तिक आणि आमिरचा हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी या दोघांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.