बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची जोडी ‘भूल भुलैय्या २’या चित्रपटानंतर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक-कियारा सध्या ‘सत्यप्रेम की कथा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “जलेगी तेरे बाप की…” ‘आदिपुरुष’ मधील ‘ते’ वादग्रस्त संवाद अखेर बदलले; आता चित्रपटात हनुमानजी बोलणार…

कार्तिक-कियाराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी कियाराने ‘भूल भुलैय्या २’ते आता ‘सत्यप्रेम की कथा’ या १ वर्षांच्या कालावधीत तिच्या आणि कार्तिकच्या मैत्रीत काय बदल झाला याबाबत खुलासा केला आहे. कियारा म्हणाली, “‘भूल भुलैय्या २’ सेटवर कार्तिक नेहमी उशिरा यायचा, तेव्हा मी त्याला खूप ओरडायचे अशा पद्धतीने मला वाट पाहायला लावू नकोस. पण, आता कार्तिक अधिक वक्तशीर झाला आहे. सध्या उलट परिस्थिती निर्माण होऊन आता त्याला माझी वाट पाहावी लागते. सध्या तो ज्या चित्रपटासाठी शूटिंग करतोय त्या चित्रपटामुळे त्याच्यात हा बदल झाला आहे. आता आम्ही दोघेही वैयक्तिक आणि प्रोफेशनलरित्या बदललो आहे.”

हेही वाचा : राम चरण आणि उपासनाच्या मुलीसाठी हॉस्पिटल परिसरात का केली गुलाबी रंगाची सजावट? कारण वाचून व्हाल थक्क

कियारा दोन्ही चित्रपटामधील फरक सांगताना म्हणाली, ‘भूल भुलैय्या २’आणि ‘सत्यप्रेम की कथा’ दोन्ही चित्रपटांमध्ये प्रचंड फरक आहे. ही एक प्रेमकथा आहे, या चित्रपटात काम करताना आम्ही स्वत:ला कार्तिक किंवा कियारा म्हणून पाहिले नाही, तर आम्ही पूर्णपणे सत्तू आणि कथा म्हणून हा चित्रपट केला. “

हेही वाचा : ‘द आर्चीज’चित्रपटाच्या ट्रोलर्सला झोया अख्तरने सुनावले खडेबोल; म्हणाली, “स्टारकिड्सला आधीच नेपोटीजम…”

दरम्यान, ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केले आहे. यामध्ये कार्तिक ‘सत्यप्रेम’, तर कियारा ‘कथा’ची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan and kiara advani friendship changed like this from bhool bhulaiyaa 2 to satyaprem ki katha sva 00