सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधल्यावर अभिनेत्री कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. यामध्ये कियारा कार्तिक आर्यनसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यापूर्वी कियारा आणि कार्तिकने ‘भूल भुलैय्या’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून २९ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “‘जवान’मध्ये काम करणे…” सान्या मल्होत्राने सांगितला अनुभव, म्हणाली “शाहरुखबरोबर…”

Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video : “तुला काहीतरी सांगायचंय…”, शिवाचा विश्वास खरा ठरणार, आशू त्याचे प्रेम व्यक्त करणार; पाहा नेमकं काय घडणार
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Bigg Boss Marathi Season 5 Fame Abhijeet Sawant Reel Video With Wife And Daughters
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा पत्नी अन् मुलींबरोबर सुंदर Reel व्हिडीओ; योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर म्हणाली…
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट

‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा टीझर किआराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. कार्तिक आर्यनच्या संवादाने या टीझरची सुरुवात होते. “जे शब्द कधीच पूर्ण होत नाहीत, वचने जी कायम अपूर्ण राहतात, हास्य जे कधी कमी होऊ नये, ती नाराज असेल, तर माझ्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत.” यानंतर कार्तिक-कियाराची ऑनस्क्रीन केमिस्ट्री या टीझरमधून प्रेक्षकांना पहायला मिळते.

टीझर रिलीज झाल्यावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देत कार्तिक-कियाराला त्यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनीही कियाराने शेअर केलेल्या टीझरवर प्रतिक्रया दिली आहे. तसेच या दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीला सुद्धा प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.

हेही वाचा : लग्नाबद्दल सारा अली खानने दिलेला ‘तो’ सल्ला चर्चेत, म्हणाली “विकी कौशल माझा चौथा सहकलाकार ज्याने…”

‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट यावर्षी २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण काही कारणास्तव यात बदल करुन ‘सत्यप्रेम की कथा’ असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader