मुंबईतील घाटकोपरमध्ये १३ मे रोजी होर्डिंग कोसळलं. या धक्कादायक घटनेत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा-मामी मरण पावले. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एक भलं मोठं होर्डिंग पडलं होतं. त्या दुर्घटनेत १६ जणांना जीव गमावावे लागले. यामध्ये कार्तिकच्या मामा व मामीचाही दुखद अंत झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होर्डिंग कोसळ्याची घटना घडल्यानंतर तीन दिवस शोध घेतल्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले. दोघांवर १६ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. कार्तिक आर्यन त्यांच्या अंत्यसंस्काराला गेला होता, तिथला त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, कार्तिक आर्यनचे मामा मनोज चांसोरिया व त्यांची पत्नी अनिता या घटनेत ठार झाले. मनोज चांसोरिया पत्नीसह कारने मुंबईला आले होते. त्यांचा मुलगा यश अमेरिकेत राहतो, त्यांना मुलाजवळ विदेशात जायचं होतं, त्यामुळे व्हिसाशी संबंधित कामासाठी ते जबलपूरहून मुंबईला आले होते. मुंबईहून माघारी जबलपूरला जाताना घाटकोपरमधील त्या पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले आणि त्याचवेळी होर्डिंग कोसळले.

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, तीन दिवसांनी पटली मृतदेहांची ओळख

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले, तेव्हापासून चांसोरिया यांचा फोन बंद झाला होता. त्यांचा मुलगा अमेरिकेतून फोन करत होता, मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मग त्यांच्या मुलाने मुंबईतील मित्रांना याबाबत माहिती दिली आणि चांसोरिया यांचा शोध घेण्याची विनंती केली. मित्रांनीही तात्काळ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत शोध सुरू केला. पोलिसांनी चांसोरिया यांचा फोन ट्रॅक केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर दाखविण्यात आले. त्यांची गाडी आत अडकली होती, त्यामुळे मृतदेह सर्वात शेवटी सापडले.

कार अपघातात अभिनेत्री पवित्रा ठार, बचावलेल्या अभिनेत्याने घेतला गळफास; शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं, “दोन दिवस वाट…”

मनोज चांसोरियांची गाडी होर्डिंगखाली अडकल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा यश याने अमेरिकेहून मुंबई गाठली. तीन दिवसांनी त्यांच्या हातातील अंगठ्यांवरून मुलगा यशने ओळख पटवली होती. गुरुवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मामा -मामीच्या अंत्यसंस्काराला कार्तिक आर्यनदेखील गेला होता.

“प्रियांका चोप्रा आणि मला नेहमीच…”, घटस्फोटानंतर देसी गर्लच्या जाऊबाईचं वक्तव्य; म्हणाली, “जोनास ब्रदर्स…”

दरम्यान, मनोज चांसोरिया हे मुंबईतील विमानतळाचे माजी संचालक होते. त्याच्या मामीचं नाव अनिता चांसोरिया होतं. मनोज चांसोरिया यांनी मुंबईच्या एटीसीमध्ये काम केले होते. वर्षभरापूर्वीच निवृत्त झाले होते आणि ते जबरपूरला राहायचे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan attended mama mami funeral photo viral ghatkopar hoarding collapse hrc