दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा ‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अशातच या चित्रपटात अक्षयच्या ऐवजी कार्तिक आर्यनची एंट्री झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरवर कार्तिकच्या एंट्रीचा खुलासा केला होता. मात्र आता कार्तिक आर्यनचीही या चित्रपटातून एग्झिट झाल्याचं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिक ‘हेरा फेरी 3’ मध्ये सामील झाल्याच्या चर्चा सुरुवातीला रंगल्या होत्या. या चित्रपटात तो अक्षय कुमारची जागा घेत ‘राजू’ची भूमिका साकारणार असं बोललं जात होतं. कुमार या चित्रपटात दिसणार नसल्याने प्रेक्षक खूप नाराज झाले होते. “हेरा फेरी ३ हा चित्रपट पाहणार नाही,” असंही अनेकजण म्हणू लागले. त्यानंतर सुनील शेट्टी यांनी “या चित्रपटात कार्तिकची भूमिका वेगळी आहे. याचा अक्षयच्या ‘राजू’ या पात्राशी काहीही संबंध नाही,” असं सांगितलं. पण आता या चित्रपटातून कार्तिक आर्यनचीही एग्झिट झाल्याची बातमी समोर येत आहे.

आणखी वाचा : ‘असा’ आहे काजोल आणि तनिषा यांनी आईला भेट दिलेला लोणावळ्यातील आलिशान बंगला, पाहा Inside Photos

‘पीपिंगमून’च्या अहवालानुसार, या चित्रपटाला होकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन स्वतःची मनमानी करू लागला. त्याला शॉट्समध्ये तो सांगेल त्यानुसार बदल हवा होता आणि बदलाचा आग्रहही होता. त्यामुळे निर्माते आणि कार्तिक यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे कार्तिकही आता या चित्रपटातून बाहेर पडला आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी किंवा कार्तिकने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा : अक्षय कुमार ‘ओह माय गॉड २’मधून देणार लैंगिक शिक्षणाचे धडे, म्हणाला…

मध्यंतरी एका कार्यक्रमात अक्षय कुमारने या चित्रपटाला नकार का दिला याचं कारण सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली होती. पण आता कार्तिक आर्यनची या चित्रपटातून एग्झिट झाल्यामुळे अक्षय कुमार या चित्रपटात पुन्हा दिसणार का हे येत्या काही दिवसात समोर येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan being outside from hera pheri 3 film rnv