अभिनेता कार्तिक आर्यन हा तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. कार्तिक आज त्याचा ३२वा वाढदिवस साजरा करतोय. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या कार्तिकने फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर चाहते आणि बॉलिवूडकर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या आडनावाबद्दल जाणून घेणार आहोत.
कार्तिक आर्यनकडे नसायचे ट्रेनचे तिकिट काढण्यासाठी पैसे; ‘त्या’ आठवणींना उजाळा देत म्हणाला होता…
कार्तिक आर्यनने २०११ साली आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली. यामध्ये त्याने रजत नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने न थांबता तब्बल ५ मिनिटं एक डायलॉग म्हटला होता. या डायलॉगची आजही चर्चा होताना दिसते. त्याचा चित्रपट हिट ठरला होता. लहान बॅनरचे चित्रपट करून कार्तिकने स्वतःच्या अभिनयामुळे इंडस्ट्रीत स्थान मिळवलंय. त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘भूल भुलैया 2’ हा यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. लवकरच त्याचा फ्रेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“वेब सिरीजमध्ये शिव्या देण्याला माझा विरोध नाही पण…”; राज ठाकरेंचं OTT सेन्सॉरशिपवर रोखठोक मत
तुम्ही अभिनेत्याला कार्तिक आर्यन नावाने ओळखता, पण त्याचं खरं आडनाव आर्यन नाही. कार्तिकचं आडनाव तिवारी आहे. कार्तिकच्या कुटुंबात आई, वडील आणि बहीण सर्वजण डॉक्टर आहेत. त्यामुळे कार्तिकनेही डॉक्टर व्हावं, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण पालकांच्या इच्छेविरुद्ध कार्तिकने मेडिकल क्षेत्रात न जाता त्याने इंजिनिअरींग केलं. नंतर त्यातही करिअर करायचं सोडून त्याने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. ३२ वर्षांच्या कार्तिकला अवघ्या २१वा वर्षी ‘प्यार का पंचनामा’ चित्रपट मिळाला आणि नंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. आता तो बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.