कार्तिक आर्यन हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये कार्तिकची सध्या चांगलीच चलती आहे. आज कार्तिक त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कित्येक कलाकारांनीही कार्तिकचा शुभेच्छा दिल्या आहेत. आज त्याच्या वाढदिवशी कार्तिकने त्याच्या चाहत्यांना एक छान सरप्राइज दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कार्तिकचा ‘शेहजादा’ या चित्रपटाची चर्चा कोविड काळापासून सुरू आहे. आज त्याच्या वाढदिवशी त्याने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोशल मीडियावर सध्या याच टीझरची चर्चा आहे. हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’मध्ये होता बिग बींचा खारीचा वाटा; रिषभ शेट्टीने केला खुलासा

कार्तिकच्या या चित्रपटाच्या टीझरची सध्या चांगलीच चर्चा आहे. खूप वर्षं त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर आजच्या दिवशी याचा टीझर लॉंच करून कार्तिकने त्याच्या चाहत्यांना खुश केलं आहे. या टीझरमध्ये कार्तिक जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. मध्यंतरी ‘पुष्पा’च्या यशानंतर मूळ चित्रपट हिंदीत डब करणार होते, पण नंतर या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा झाली असल्याने याचा हिंदी डबचा विचार बाजूला ठेवला गेला. यावरुन बराच वादही झाला होता.

कार्तिकच्या या टीझरमध्ये एक संवाद आपल्याला ऐकायला मिळतो, “जाब बात फॅमिलीपे आती है, तो डिस्कशन नहीं, अॅक्शन करते है.” हा संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. शिवाय कार्तिकचा हटके लूक आणि दमदार अॅक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. तसंच या चित्रपटाला अल्लू अर्जुनच्या चित्रपटाप्रमाणे यश मिळेल का याविषयीही सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची दिग्दर्शन रोहित धवन करत असून, कार्तिकबरोबर क्रीती सनॉन, परेश रावल, मनीषा कोइरालासारखे कलाकारही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे.