बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या ९ दिवसांत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ५६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या या भरघोस यशानंतर कार्तिक आर्यनने मुंबईतील जुहू येथे एक आलिशान घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षाच्या सुरुवातीला, कार्तिकने शाहिद कपूरचे जुहू येथील घर भाड्याने घेतल्याचे वृत्त आले होते. दरमहा ७.५ लाख रुपये इतके शाहिदच्या घराचे भाडे होते. आता कार्तिकने जुहू येथील त्याच परिसरात आलिशान घर खरेदी केले आहे. एका संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकचे हे आलिशान घर जुहू येथील प्रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सिद्धी विनायक बिल्डिंगमध्ये आहे. याच कॅम्पसच्या प्रेसिडेन्सी सोसायटीमध्ये आठव्या मजल्यावर कार्तिकचे कुटुंब राहते. कार्तिकने आता घेतलेले घर हे दुसऱ्या मजल्यावर आहे. १९०० चौरस फूट असलेल्या या घराची किंमत तब्बल १७.५० कोटी आहे. ३० जून रोजी कार्तिकने या घरासंबंधित अंतिम करार केल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – Neetu Kapoor Birthday Special: नीतू कपूर लग्नात भर मंडपात पडल्या होत्या बेशुद्ध; जाणून घ्या कारण

हेही वाचा – Video: राखी सावंत पुन्हा पतीच्या शोधात, भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; नेटकरी म्हणाले, “हिच्यापेक्षा…”

या आलिशान घराबरोबर कार्तिकला दोन गाड्या पार्किंगसाठीही जागा दिली आहे. तसेच अभिनेत्याने स्टँप ड्यूटीसाठी १.५ कोटी रुपये भरले आहेत. याआधी २०१९ साली, कार्तिकने वर्सोवा येथे ४५९ चौरस फुटांच्या अपार्टमेंटमध्ये १.६० कोटींची गुंतवणूक केली होती. जेव्हा तो ग्वाल्हेरहून पहिल्यांदाच मुंबईत आला होता, तेव्हा तो याठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहिला होता.

हेही वाचा – प्रिया बापटनं ‘हा’ फोटो शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा; ओळखा पाहू ‘ही’ मालिका

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर लवकरच ‘आशिकी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानंतर ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात कार्तिक दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan buy luxury house in mumbai juhu pps